SNBP All-India Hockey Tournament : एसएनबीपीसह ध्यानचंद अकादमी, ग्रासरुट हॉकी बाद फेरीत

एमपीसी – यजमान एसएनबीपी अकादमी, ध्यानचंद अकादमी, ग्रासरुट हॉकी, स्मार्ट हॉकी अकादमी, रितुराणी हॉकी अकादमी यांनी आपले सर्व सामने जिंकताना येथे सुरु असलेल्या १६ वर्षांखालील गटाच्या हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु आहे.
राष्ट्रीय हॉकी अकादमी स्पर्धेत विजेते आणि उपविजेते ठरलेल्या अनुक्रमे आर्मी बॉईज स्पोर्ट्स केंद्र आणि ऑलिम्पियन विवेक सिंग अकादमी संघांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.
स्पर्धेत आजही गोलांचा पाऊस कायम राहिला. दिवसातल्या अखेच्या सामन्यात गतविजेत्या राऊरकेलाच्या सेल संघाने ऑलिम्पियन भास्करन हॉकी अकादमी संघाचा २८-० असा धुव्वा उडवला. बाद फेरी प्रवेशासाठी सेल संघाना २४ गोलने विजय मिळविण्याची आवश्यकता होती.
दिवसातील अन्य सामन्यात यजमान एसएनबीपी अकदमी संघाने कुशिदा स्कूलचा ४-० असा पराभव केला. ध्यानचंद अकादमी संघाने कोलकता वॉरियर्सचे आव्हान १२-०, स्मार्ट अकादमी संघाने आर. के. रॉय अकादमीचा २-१ असा पराभव केला.
निकाल – 
गट एच : ग्रासरूट हॉकी: ६ (शुभम चौधरी ३, २८वे, गौरव सिंग 6, २४वे, सूरज कुमार ३६वे, रोहित ५१वे मिनिट) वि.वि. हॉकी नाशिक: 0. मध्यंतर – 4-0
गट ए : एसएनबीपी अकादमी: ४ (अमृत पावरा ६, २३वे मिनिट; मोहम्मद शाहिद ११वे मिनिट,  आदिल खान २९वे मिनिट) वि.वि. कुशिदा स्कूल, पश्चिम बंगाल: 0.
गट ब : नेव्हल टाटा हॉकी अकादमी, जमशेदपूर : २ (मोहम्मद जाईद 9वे, अंकुश) बरोबरी वि. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) अमृतसर: 2 (जगदीत सिंग २६वे, हसरदेव सिंग २८वे मिनिट) . मध्यंतर १-२
गट डी : ध्यानचंद हॉकी अकादमी: 12 (त्रिलोक वेणवंशी २, १२वे मिनिट,  अरबाज ४थो, १०वे मिनिट, कृष्ण मोहन ९, १४वे मिनिट; अकीब अहमद १३वे रोहन सिंग ३०वे; सोहम काशीद 32वे प्रमोद पाल३४वे सूरज 41वे, ज्ञानेश कुमार ५७वे मिनिट) वि.वि. कोलकाता वॉरियर्स, कोलकाता: 0. मध्यंतर ८-०
गट -ई: स्मार्ट हॉकी अकादमी : २ (शुभंकर सोनकर 13रे; ब्रह्मज्योतसिंग मणी 57वे मिनिट) वि.वि. आर.के. रॉय अकादमी, पाटणा : १ (नितीन 37वे). मध्यंतर 1-0
गट एफ : अन्वर हॉकी सोसायटी : ४ (मिथलेश यादव २ रे मिनिट, केतन कुशवाह १९वे, शाहरुख अली ३५ आणि ४९वे मिनिट) वि.वि. ऑलिंपियन विवेक सिंग अकादमी, वाराणसी: 0 मध्यंतर 2-0
गट जी: सेल हॉकी अकादमी, राउरकेला: 28 (सुनील लाक्रा३, १०, १६, २०, २१, २३, ३१, ३६वे मिनिट, देवनाथ ननवर ५, ३२, ३५वे मिनिट; सलमान लाक्रा ११वे मिनिट, अरबाज खान १७, ५२वे मिनिट, रोहित सिंग १८, ३४, ३९, ४२, ४३वे मिनिट, नवीन कुमार लाक्रा२२, २६वे मिनिट, युवराज सिंग 23वे मिनिट रिचडसन सोरेंग २७वे मिनिट अमित टोपनो २८, ४५, ४६वे मिनिट; साहिल २९वे मिनिट) वि.वि. ऑलिंपियन भास्करन हॉकी अकादमी: 0. मध्यंतर १७-०
(रविवार) : गट -एफ: आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी, बेंगळुरू: ४ (दया राम १ले, ३४वे मिनिट, नितेश शर्मा ४४वे मिनिट, छत्तीजी बारा ५४वे मिनिट) वि.वि. अन्वर हॉकी सोसायटी : 2 (अतेय १२वे,  गौरव यादव 56 वे मिनिट). मध्यंतर १-१

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.