Talegaon Dabhade : ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी….

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत 1997-98 च्या बॅचचे स्नेहसंमेलन संपन्न

एमपीसी न्यूज – रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत 1997-98 च्या बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. महाराष्ट्राच्या विविध भागात व्यवसाय, नोकरी आणि विविध कारणांसाठी स्थायिक झालेल्या 75 माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. ऋणानुबंधाच्या गाठी जिथे पडल्या आणि मैत्रीच्या नव्या नात्याला सुरुवात झाली, असे अनेक प्रसंग, किस्से या विद्यार्थ्यांनी आपापसात शेअर केले. तब्बल 24 वर्षानंतर हे विद्यार्थी पुन्हा शाळेत हजर झाले.

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, तळेगांव दाभाडे येथील वर्ष 1997 – 98 या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर नुकतेच संपन्न झाला.अनेक वर्षांनी जुन्या आठवणींना मिळाला उजाळा!

उस्मानाबाद, सोलापूर, मुंबई, नाशिक, पुणे, सांगली आणि मावळ तालुक्यातील होस्टेलला वास्तव्यास असणारे विद्यार्थी आणि मुली असे 75 माजी विद्यार्थी आणि शिक्षक यानिमित्ताने उपस्थित होते.

अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि विविध स्पर्धांचा आनंद घेत पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणीत रमले.

शाळेबाबतीत असलेली कृतज्ञता आणि सामाजिक भान लक्षात ठेवून या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या निधी संकलनातुन शाळेला संगणक संच भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.