Snooker Tournament: स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा 2022

एमपीसी न्यूज: द क्यु क्लब तर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत अमरदीप घोडके, आकाश टक्काळ, (Snooker Tournament) अनिल कुमार, रोहन कोठारे,आशुतोष पाध्ये, सुमित अहुजा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीकडे आगेकूच केली.

 

 

 

वडगांव-शेरी येथील द क्यु क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या चुरशीच्या झालेल्या सामन्यात अमरदीप घोडके याने एमडी सलमान याचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्याची पहिली फ्रेममध्ये सलमानने 43-35 अशी जिंकली. दुसरी फ्रेम अमरदीपने 69-62 अशी जिंकत 1-1 अशी बरोबरी केली. तिसरी फ्रेम 74-36 अशा गुणफरकाने जिंकत अमरदीपने 2-1 अशी आघाडी घेतली. चौथ्या फ्रेममध्ये सलमाने याने सामन्यात मुसंडी मारताना 68-13 गुणांसह 2-2 अशी बरोबरी साधत चुरस निर्माण केली. निर्णायक आणि अंतिम फ्रेममध्ये दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गुणांसाठी जोरदार प्रयत्न केले. पण केवळ ४ गुणांच्या फरकाने अमरदीपने 72-68 असा जिंकत सामना 3-2 असा जिंकला.

 

 

 

Deadbody Found: बेपत्ता मुलीचा गावाजवळच सापडला मृतदेह, मावळातील कोथुरणे गावातील घटना

 

आकाश टक्काळ याने अभिजीत रानाडे याचे आव्हान 58-29, 48-42, 15-54, 52-44 असे संपुष्टात आणून स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला.अनिल कुमार याने अभिषेक बोरा याचा 56-29, 52-32, 67-18 असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला. रोहन कोठारे याने साहील डागा याचा 43-53, 66-41, 65-51 असा एकतर्फी पराभव केला.

 

आशुतोष पाध्ये याने अक्षय तलवानी याचा 13-56, ६१-19, 74-38, 56-15 असा पराभव करून मुख्य फेरीकडे वाटचाल केली. एकतर्फी झालेल्या सामन्यात सुमित अहूजा याने कार्तिक दिवेदी याचा 76-05, 75-16, 64-08 असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा निकालः पात्रता फेरीः
अमरदीप घोडके वि.वि. एमडी सलमान 35-43, 69-62, 74-36, 12-68, 72-68;
आकाश टक्काळ वि.वि. अभिजीत रानाडे 58-29, 48-42, 15-54, 52-44;
अनिल कुमार वि.वि. अभिषेक बोरा 56-29, 52-32, 67-18;
रोहन कोठारे वि.वि. साहील डागा 43-53, 66-41, 65-51;
आशुतोष पाध्ये वि.वि. अक्षय तलवानी 13-56, 61-19, 74-38, 56-15;
सुमित अहूजा वि.वि. कार्तिक दिवेदी 76-05, 75-16, 64-08;

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.