Covid Testing Advisory : …तर कोरोना चाचणीची आवश्यकता नाही, आयसीएमआरचा महत्वपूर्ण निर्णय

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असून, तिसरी लाट जवळपास सुरू झाल्याचं चित्र आहे. आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना चाचणीबाबत आयसीएमआरने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार आता रुग्णसंपर्कातील व्यक्ती अतिजोखमीच्या गटातील नसेल तर त्यास कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. असे नव्या नियमावलीत म्हटले आहे. 
कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना चाचणी करावी लागते मात्र, रुग्णसंपर्कातील व्यक्ती वयोवृध्द अणि सहव्याधीग्रस्त नसेल तर चाचणी करण्याची गरज नाही. मात्र, ज्यांचे वय जास्ती आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. असे ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. तसेच, आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक नसल्याचे ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केले आहे.

तत्त्पूर्वी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रुग्णांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या़ त्यानुसार कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बाधित असल्याचे आढळल्यानंतर सातव्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडणे शक्य होणार आहे. रुग्ण बाधित आल्यानंतर सलग तीन दिवस त्याला ताप नसेल तर चाचणी न करता त्याला घरी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.