Board Exams : दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांविरोधात आतापर्यंत दहा गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज : राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांविरोधात आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले आहेत. (Board Exams) त्यात सर्वाधिक तीन गुन्हे अमरावती विभागीय कार्यालयाअंतर्गत, प्रत्येकी दोन गुन्हे पुणे, नागपूर, औरंगाबाद विभागीय कार्यालयाअंतर्गत, तर एक गुन्हा मुंबई विभागीय कार्यालयाअंतर्गत दाखल झाला असून, गेल्या काही वर्षांत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद यंदा झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.

 

करोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना विविध सवलती देण्यात आल्या होत्या. यंदा त्या सर्व सवलती रद्द करून प्रचलित पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे.

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथून कोयत्यासह तरुणाला अटक

 

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की राज्य मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा अत्यंत काटेकोर पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला आहे.(Board Exams) परीक्षेपूर्वी मुख्य सचिवांनी राज्य मंडळ आणि राज्यभरातील संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते, असेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.