Pune News : ..तर तृप्ती देसाईंना तोडीस तोड उत्तर देऊ : ब्राह्मण महासंघ

एमपीसी न्यूज : शिर्डी संस्थानने भाविकांच्या पोषाखा बाबत जो काही निर्णय घेतला आहे त्याला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेेच तृप्ती देसाईंनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्याला तोडीस तोड उत्तर देईल असा इशाराही ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.

ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष अ‍ॅड. नीता जोशी म्हणाल्या, शिर्डी देवस्थान ने भाविकांच्या पोषाखा बद्दल जो काही निर्णय घेतला आहे त्याला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा आहे. देवस्थानच्या या निर्णयाबद्दल तृप्ती देसाईना काही तक्रार असेल तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे योग्य नाही. त्यांनी शिर्डी मध्ये जाऊन तो फलक हटवण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्यांना तोडीस तोड उत्तर देईल.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोशाखात यावे अशी विनंती वजा सूचना साईबाबा संस्थानने केली आहे. यावरून आता मोठा वाद पेटला आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही स्वतः येऊन काढू असा इशाराच दिला आहे. मंदिरातील पुजारी हे अर्धनग्न अवस्थेत असतात. ते फक्त सोवळे नेसतात. यावर कधी कोणत्या भक्ताने आक्षेप घेतले नाही. असे नमूद करत तृप्ती देसाई यांनी संस्थानच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.