Pimpri : सांस्कृतिक क्षेत्रात अनेक संधी – भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज – ग्लॅमर असणा-या सांस्कृतिक व कला क्षेत्रात स्वत:ची प्रतिमा तयार होण्यासाठी प्रथम कलाकारांनी स्वत:ची प्रतिभा विकसित करावी. या क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. परंतू आव्हाने स्वीकारण्याची आणि नवीन प्रयोग करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. त्यांना या क्षेत्रात अनेक संधी आहेत, असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केले. 

‘स्वर रंग’ या संस्थेच्या ‘स्वामी समर्थ दाता’ या ऑडिओ, व्हिडीओ अल्बमचे गुरुवारी पिंपरीत भोईर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी पार्श्वगायिका पूजा पांचाळ, संगीतकार – निर्माता लहु पांचाळ, सहनिर्माता पोपट नखाते, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, उद्योजक दीपक मेवाणी, सामाजिक कार्यकर्ते अमर कापसे, पिंपरी-चिंचवड कलाकार महासंघाचे अध्यक्ष विजय उलपे, रामचंद्र गोरे, सतिश मोटे, डॉ. अनिकेत अमृतकर, संकल्प गोळे, राखी चौरे, संयोजक चिंतन मोडा, कॅमेरामन सागर मोरे, श्रीधर मोरे आदी उपस्थित होते.

भोईर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराची सांस्कृतिक, कला क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी. यासाठी ‘स्वर रंग’ सारख्या संस्थांनी राबविलेला उपक्रम स्त्युत्य आहे. अशा प्रकारच्या ऑडीओ, व्हिडीओ, अल्बम, शॉर्ट फिल्मसाठी आवश्यक असणारे कुशल, तांत्रिक मनुष्यबळ आता शहरात उपलब्ध होत आहे. अशा उपक्रमांतून स्थानिक नव कलाकारांना व्यासपीठ मिळेल. तसेच तांत्रिक काम करणारांना रोजगार मिळेल. धार्मिक विषयांबरोबरच सामाजिक प्रश्नांची, मुद्देसुद मांडणी करणारे विषय घेऊन ‘स्वर रंग’ सारख्या इतर संस्थांनी देखील काम करावे असेही भोईर यांनी सांगितले.

संगीतकार – निर्माता लहु पांचाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन व आभार अमर कापसे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.