Sobat Sakhichi : सोबत सखीची…आपल्याला Hypothyroidism चा त्रास आहे का?

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. थायरॉइड आजरावरील दूसरा भाग Hypothyroidism विषयावरील या मालिकेतील हा​ सतरावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 17

आपल्याला Hypothyroidism चा त्रास आहे का?

नमस्कार. सोबत सखीची या यु ट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. मी आहे आपली सखी डॉ. गौरी. मागच्या आठवड्यात सुरु केलेल्या थायरॉईडच्या व्हिडीओचा हा भाग दुसरा आहे. त्यामुळे ज्यांनी तो भाग बघितला नाही, त्यांनी तो ही भाग नक्की बघा आणि चॅनेलवर नवीनच असाल तर channel ला subscribe जरूर करा. अधिक वेळ खर्च  न करता आपण आजच्या व्हिडीओला सुरुवात करुया.

मागच्या आठवड्यातला शेवटचा प्रश्न होता आपल्याला थायरॉईडचा आजार झालाय हे ओळखायचं कसं? प्रश्न जेवढा सोपा आहे, उत्तर तेवढेच कठीण आहे. थायरॉईडचा आजार झालाय हे ओळखायला खरच कठीण आहे.  जसा ताप आल्यानंतर आपल्याला अंग गरम जाणवते, उलटी होताना आपल्याला दिसते, तसं थायरॉईडचं एकच ठराविक लक्षण दिसत नाही. थायरॉईडच्या complaints बऱ्याचशा vague वाटतात, किंवा psychological आहेत असं वाटतात किंवा त्या complaints ऐकून घरच्यांना ही व्यक्ती उगाचच छोट्या गोष्टींचा मोठा बाऊ करतीये असं वाटतं आणि त्यामुळे ही लक्षणं अनेकदा दुर्लक्षित आणि untreated अशी राहतात. मात्र तुमच्या डॉक्टरांकडे गेलात आणि त्यांना ही सर्व लक्षणे सांगितलीत तर डॉक्टर या लक्षणांचा संबंध थायरॉईडच्या आजारांशी आहे का? हे पडताळून बघतात व निदान कन्फर्म करण्यासाठी थायरॉईड function test suggest करतात.

आपल्याला कोणती लक्षणं जाणवतात यावरुन थायरॉईडच्या  आठ आजारांपैकी कोणता आजार आहे, याचा  साधारण अंदाज बांधता येतो आणि thyroid च्या काही टेस्ट्स करून करून आपलं निदान confirm करता येतं. या आठ आजारांमध्ये Hypothyroidism आणि Hyperthyroidism हे खूप कॉमन आहेत.

कित्येकदा असंही होतं, की  काही त्रास जाणवत नसताना सहज तपासणी होते, आणि रक्ताच्या रिपोर्टमध्ये थायरॉईड हार्मोनची abnormal लेव्हल दिसून येते. अशा वेळी हार्मोन्सच्या गोळ्या घ्याव्या की आहार, व्यायाम अथवा आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी औषधांचा उपयोग करावा हे मात्र आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवावे. हार्मोन्सच्या level खूपच abnormal असतील कधी कधी endocrinologist ची देखील मदत घ्यावी लागते. आज आपण hypothyroidism या आजाराची ओळख करून घेऊ.  मागच्या एका व्हिडिओ मध्ये आपण HPO axis ची तुलना रिले रेसशी केली होती. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. त्यात आपण काय बघितलं होतं ?

Thyroid हॉर्मोन्सचं प्रॉडक्शन होण्यासाठी मेंदूतल्या hypothalamus पासून pitutory ग्रंथीला TRH म्हणजे Thyroid Releasing  हार्मोन च्या रूपाने सिग्नल दिला जातो. या TRH मुळे Pitutory ग्रंथी TSH अर्थात Thyroid Stimulating Hormone या हार्मोनच्या रूपाने Thyroid gland ला सिग्नल पुरवते आणि तो सिग्नल मिळाल्यानंतरच Thyroid gland T3 आणि T4 या दोन हार्मोन्स चं production करते. यातही T4 अधिक महत्त्वाचं आहे, कारण T4 पासूनच पुढे T3 ची निर्मिती होते.

Thyroid चे कार्य शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या metabolism शी निगडीत असल्याने Hypothyroidismमध्ये शरीराचा metabolic rate प्रमाणापेक्षा कमी होतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात थकवा जाणवणे, हालचाली मंदावणे, हृदयाचे ठोके प्रमाणापेक्षा कमी असणे, अतिरिक्त आहार न घेताही वजन वाढणे, केस गळणे, थोडीशी थंडी देखील सहन न होणे, constipation चा त्रास होणे, गळ्यापाशी सूज अथवा गाठ जाणवणे ही सर्वसामान्यपणे Hypothyroidism ची लक्षणे दिसून येतात. या व्यतिरिक्त देखील काही लक्षणे दिसू शकतात.

Thyroid gland ला stimulate करून T3 आणि T4 चे प्रॉडक्शन करण्यासाठी Pituitary TSH या हार्मोनचे अधिकाधिक secretion करू लागते, पण तरीही thyroid ग्रंथी thyroid hormones चं production करण्यात कमी पडते. Thyroid function टेस्ट केल्यास त्यात Thyroid हॉर्मोन्स ची म्हणजे T3 आणि T4 यांची  मात्रा कमी झाल्याचे आणि TSH चे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येते.

जन्मजात थायरोईड हार्मोन्सची मात्रा कमी असणे,थायरोईड ग्रंथीला सूज येणे, आहारातून कमी प्रमाणात आयोडीन शरीरात जाणे, डिलिव्हरी नंतर अचानक thyroid ग्रंथीची ताकद कमी होणे किंवा Hashimoto disease सारखा एखादा autoimmune ज्याला स्वयं प्रतिरोधक आजार असे म्हणले जाते अशा व अन्य  काही आजारांमध्ये Thyroid हॉर्मोन्सची मात्रा कमी होते.

Thyroid ग्रंथीचं कार्य योग्य प्रमाणात होण्यासाठी आयोडीन, सेलेनियम आणि झिंक यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. हे तिन्ही घटक supplement च्या स्वरुपात घेण्यापेक्षा आहारातून नैसर्गिकरित्या मिळवण्याचा प्रयत्न करावा.  आहारात योग्य प्रमाणात आयोडाइज्ड मीठ घ्यावे. अति आयोडीनचा वापर देखील शरीरासाठी घातक असतो. सी फूड मधून उत्तम मात्रेत आयोडीन शरीरात जाते. दूध आणि दुग्ध जन्य पदार्थ यांचा वापर,फ्लॉवर, कोबी व पालक यांचा अतिरेक टाळून सर्व प्रकारच्या भाज्या, पीच, पीयर, बेरी यांचा अतिरेक टाळून सर्व प्रकारची फळे, सोयाबीन, नाचणी, ज्वारी, बाजरी यांचा अतिरेक टाळून सर्व  प्रकारची धान्ये यामधून मुबलक प्रमाणात आयोडीन, सेलेनियम व झिंक शरीरात जाते. आहारातील processed फूड, fried फूड यांचा अतिरेक टाळावा.

जाता जाता काही हेल्थ टिप्स –

1. रोज किमान 7 – 8 तास शांत झोप घ्यावी. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहायला मदत तर होतेच, शिवाय हार्मोन्सची लेव्हल कमी व्हायला मदत होते.
2. मन लाऊन जेवावे …जेवताना टीव्ही बघत, अवेळी, उभ्याने, गप्पा मारत असं जेऊ नये. मन लावून जेवल्यामुळे शरीरात चयापचयाची क्रिया योग्य होते व आहारातील उपयुक्त घटकांचे अपेक्षित health benefits मिळतात.
3. दैनंदिन जीवनात व्यायाम आणि मेडिटेशनचा नियमित रुपाने उपयोग करावा. Walking, Running, Cycling यापैकी आपल्याला आवडेल तो exercise, योगा, Weight ट्रेनिंग, लो impact एरोबिक्स या व्यायाम प्रकारांचा उपयोग केल्यास वजन प्रमाणात रहाते, tissue metabolism सुधारल्यामुळे  thyroid hormone च्या गोळ्यांचा डोस कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते.

पुढचे अजून बरेच प्रश्न पेंडिंग आहेत, Hyperthyroidism म्हणजे काय ? thyroid चा pregnancy वर काय परिणाम होतो ? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात नक्की भेटू, तोपर्यंत धन्यवाद.

– डॉ. गौरी गणपत्ये
M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet
स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ
मोबाईल: 9423511070
ई-मेल: [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.