Sobat Sakhichi : सोबत सखीची – व्यायाम पिंपल्स रोखण्यासाठी

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. व्यायाम – पिंपल्स रोखण्यासाठी… या विषयावरील या मालिकेतील हा​ बारावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 12

व्यायाम – पिंपल्स रोखण्यासाठी

नमस्कार. मागच्या व्हिडिओ / लेखामध्ये आपण पिंपल्स आणि आहार यांचा संबंध आणि पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त आहार याबद्दल माहिती घेतली. आज आपण पिंपल्स कमी करण्यात व्यायामाचा काय रोल आहे? आणि पिंपल्स कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा यासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग ….

व्यायामामुळे आपल्याला ताजेतवाने वाटत, शरीरातलं रक्ताभिसरण वाढते. मनावरचा ताण कमी होऊन मन प्रसन्न वाटते. वाढलेले वजन कमी होऊन शरीराला हलकेपणा येतो. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील toxins शरीराच्या बाहेर पडण्यासाठी मदत होते. घाम आल्याने त्वचा स्वच्छ व्हायला आणि त्वचेवरची pores open व्हायला मदत होते. पिंपल्सच्या प्रोसेस मध्ये तयार होणारे सीबम जे त्वचेच्या खाली सिबेशियस ग्रंथीमध्ये अडकून पडले असते, ते शरीरासाठी आणि पर्यायाने चेहर्‍यासाठी एक प्रकारे toxin च आहे. जेव्हा चेहर्‍यावरचे pores व्यवस्थित open होतात, तेव्हा हे सीबम सिबेशियस gland मधून पूर्णपणे बाहेर पडत.

खरतर व्यायामाचा पूर्ण शरीरावर आणि मनावर इफेक्ट होतो. पण काही खास प्रकाराचे व्यायाम पिंपल्सचा त्रास असणार्‍या लोकांसाठी फायदेकारक ठरतात. Aerobics आणि योगा या दोन्ही व्यायाम प्रकारांचा पिंपल्ससाठी कसा उपयोग होतो ते आता आपण पाहू. Aerobicsया व्यायाम प्रकारात शरीरात जास्त ऑक्सिजन खेचला जातो आणि तशाच प्रमाणात शरीरातल्या पेशींपर्यंत पोचवला जातो. हा व्यायाम प्रकार हार्ट रेट वाढवतो, हार्टची pumping अ‍ॅक्शन वाढवतो, म्हणून काही जणAerobic एक्झरसाइजलाच कार्डिओ exercise असे म्हणतात. Aerobics मुळे छोट्या छोट्या block झालेल्या रक्त वाहिन्या forcefully उघडल्या जातात, ब्लड circulation improve होते. अरोबीक किंवा कार्डियो exercises चा उपयोग fat burning साठी होतो. वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग या सारखे काही aerobic exercises चा शरीराचा endurance, स्ट्रेन्थ आणि flexibility वाढण्यासाठी उपयोग होतो. मैदानी खेळ हा सुद्धा एक छान व्यायाम प्रकार आहे. स्थूल वजनाचे, डायबेटीस, थायरोईड यासारख्या हार्मोनल disorders असणार्‍या लोकांना वजन कमी करण्यासाठी aerobic exercises चा

चांगला उपयोग होतो.यात भरपूर variation आहे.झुम्बा dance हा हि एक प्रकारचा aerobic exercise. आता माहिती बघूया योगासनांची. योगासनांमुळे शरीराची flexibility वाढते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दाब पडतो. त्या भागातील रक्ताभिसरण वाढतं. श्वासावर नियंत्रण मिळवणे हे फार महत्वाच काम योगासनांच्या माध्यमातून साधल जातं. योगा म्हणजे फक्त काही आसनं असा अर्थ नसून हे बॉडी, माइंड आणि meditation या सर्वांचा सुसंवाद आहे. यामुळे शरीरातल्या वाढलेल्या स्ट्रेस हार्मोन्स ची level कमी होते. योगासनाने शरीराची immunity पॉवर वाढते, तर aerobics ने metabolism बूस्ट होते.अर्थात aerobics आणि योगा या दोन्हींचा योग्य मेळ घालण हे सर्वात महत्वाच. आता आपण पिंपल्स साठी उपयुक्त ठरणार्‍या काही योगासनांची माहिती बघू. Aerobics overall शरीराच्या फिटनेस साठी उपयोगी असतात त्यामुळे खास पिंपल्ससाठी असे काही exercises फारसे suggest करता येत नाहीत. योगासानच देखील थोडफार तसच आहे, मात्र yes काही योगासनांचा overall शरीरासाठी उपयोग होतोच, पण त्याच सोबत पिंपल्स कमी होण्यासाठी सुद्धा उपयोग होतो.

अशा दहा योगासनांची माहिती आज आपण जाणून घेऊ.

  1. प्राणायाम – प्राणायामाच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे फुफ्फुसांची capacity वाढते. स्ट्रेस कमी होऊन हार्मोनल acne चं प्रमाण कमी होतं. श्वासावर उत्तम नियंत्रण ठेवता येते.
  2. मत्स्यासन – मन आणि शरीर दोन्ही रिलक्स होतं. स्ट्रेस आणि emotional imbalance कमी होतो॰ चेहर्‍याच्या स्नायूंना ताणले जाण्याचा व्यायाम.
  3. धनुरासन – हा backward bending चा योगासन प्रकार पाठीच्या कण्यासाठी आणि पोटाच्या विकारांसाठी खूप उपयुक्त ठरतो. अर्थात मणक्याचे आणि पोटाचे आधीचे काही विकार असतील तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यायाम प्रकार करायला हवा.
  4. सर्वांगासन – शरीरासाठी आणि चेहर्‍यासाठी सर्वांग सुंदर व्यायाम exercise, शरीर व मन रिलक्स करण्यासोबतच रक्तपुरवठा देखील वाढवते. यामध्ये पायाच्या बाजूने उलट रक्त प्रवाह डोक्याच्या बाजूला येते, दाबामुळे बारीक बारीक रक्तवाहिन्या मध्ये असलेला अडथळा दूर होतो आणि चेहर्‍यावरचा रक्त पुरवठा वाढतो, चेहरा healthy आणि rosy कलरचा दिसायला लागतो.
  5. चक्रासन – पाठीच्या कण्याला उत्तम flexibility देत त्याशिवाय चेहरा आणि डोक्याच्या भागाला रक्त पुरवठा वाढवत.
  6. हलासन – constipation चा त्रास असणार्‍या व्यक्तींसाठी फायदेशीर. चेहर्‍याच्या भागाकडे रक्त पुरवठा वाढवते.आणि inflammatory acne हील होण्याचे प्रमाण वाढते.
  7. त्रिकोणासन – छातीच्या स्नायूसाठी आणि फुफ्फुस व हृदयासाठी उत्तम व्यायाम. चेहर्‍याच्या स्कीनला भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करून मृत पेशी स्किनच्या सर्वात वरच्या स्तरापर्यंत पोचवून नवीन प्रेशींच्या निर्मिती मध्ये सहाय्य मिळते.
  8. अधोमुखश्वानासन – हाता पायाचे स्नायू छान ताणले जातात, चेहर्‍याचा भाग खाली तोंड केलेल्या अवस्थेत असल्यामुळे चेहर्‍याकडे अधिक रक्त पुरवठा होतो व त्वचे मधली बंद असलेली pores open होण्यासाठी आतून चेहर्‍याला दाब मिळतो.
  9. भुजंगासन – पाठीच्या कण्याला backward bending चा उत्तम व्यायाम. यामध्ये मानेचे व चेहर्‍याचे स्नायू ताणले जातात आणि ब्लॉक झालेले pores flush आऊट व्हायला मदत होते.
  10. सूर्यनमस्कार –  हा ही एक सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. हे actually अनेक व्यायामांच एक मिश्रण आहे. त्यामुळे वरील सर्व योगासनांचे benefits एकट्या सूर्य नमस्कारामुळे मिळतात.

Abs, burpees, planks हे पोटाच्या स्नायू साठी तसच पचन संस्थेच कार्य नीट होण्यासाठी मदत करतात. हाताच्या बोटावर मोजण्यासारखी काही लोकं असतात त्यांना post workout pimples होण्याची तक्रार असते. अशा लोकांनी वर्कआउट च्या आगोदर heavy कॉस्मेटिक्स चा वापर न करण, स्वछ धुतलेल योगा मॅट वापरण, केस मोकळे न सोडता बांधूनएक्झरसाइज करण, दुसर्‍याने वापरलेली instruments वापरण्यापूर्वी क्लीन असल्याची खात्री करून घ्यावी. व्यायाम करताना सतत चेहर्‍याला हात न लावणे, घामाचे कपडे त्वरित बदलणे, gym मधून आल्यावर स्वच्छ अंघोळ करणे, आपले मोबाईल स्क्रीन स्वच्छ ठेवणे,यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

तर एकंदर तुम्हाला pimples मध्ये व्यायामाचा उपयोग आणि पिंपल्स टाळण्यासाठी कोणते व्यायाम करायचे याबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. पुढच्या आठवड्यात पिंपल्स च्या ट्रीटमें बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद!

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.