Sobat Sakhichi : सोबत सखीची… थायरॉइडचे आजार कसे व का होतात?

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. थायरॉइडचे आजार कसे व का होतात? विषयावरील या मालिकेतील हा​ सोळावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 16

थाइरोइडचे आजार कसे व का होतात?

नमस्कार, सोबत सखीची या ट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करते, मी आहे आपली सखी डॉ गौरी. तुम्हाला thyroid चा  आजार आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तुम्हाला  टेन्शन  आलंय का ? थायरॉईडचा त्रास म्हणजे नेमकं काय असत ? thyroid च्या त्रासापासून सुटका होण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे? असे  प्रश्न तुम्हालाही पडले आहेत  का? तर मग आजचा video शेवटपर्यन्त बघा आणि चनेल वर नवीन असाल तर जुने आणि नवीन video बघण्यासाठी  चनेल ला subscribe करा.  आजच्या video मध्ये आपण thyroid बद्दल अगदी साध्या आणि सोप्या शब्दात शास्त्रीय माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग..

1. सर्वात आधी आपण जाणून घेऊ thyroid म्हणजे नक्की काय आहे ?
thyroid ही butterfly आकाराची शरीरातली एक महत्त्वाची ग्रंथी आहे जी गळ्याच्या मध्यभागी असते.त्याचं वजन जेमतेम 10 ते 20 ग्रम असतं.  Thyroid gland  द्वारा  thyroid hormone चा स्त्राव होतो.T 3, T 4 आणि Calcitonin या तीन महत्त्वाच्या हार्मोन्सचा स्त्राव thyroid ग्रंथी मार्फत होतो. त्यातल्या thyroid च्या वेगवेगळ्या आजारांच्या दृष्टीने T3 T4 हे हार्मोन्स महत्वाचे असतात.

2. आता आपण बघू, thyroid चं  महत्व काय आहे?
शरीरातल्या प्रत्येक  महत्वाच्या अवयवावर इतकंच नव्हे तर  शरीरातल्या प्रत्येक पेशीवर थायरोईड हार्मोन चा प्रभाव असतो. शरीरांतर्गत होणाऱ्या Metabolism (चयापचय) अर्थात शरीरासाठी लागणाऱ्या energy चा balance, Growth (वाढ) अर्थात शरीरातील हाडांची वाढ, उंची  आणि Development (विकास) अर्थात मेंदू, reproductive system यांचा विकास  या महत्वाच्या कामांमध्ये thyroid gland च मोठा सहभाग असतो शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये thyroid चे receptors असतात, त्यामुळे शरीरातल्या प्रत्येक पेशीवर thyroid ची अ‍ॅक्शन होते.

3. Thyroid चे विकार कोणाला होऊ शकतात?
याचं उत्तर साधं  आहे, कोणालाही होऊ शकतात. त्यातल्या त्यात स्त्रियांना thyroid चे आजार जास्त होतात. 60 टक्के लोकांना आपल्याला thyroid disease आहे हेच मुळात माहीत नसतं. स्त्रियांना पुरुषांपेक्षा पाच पट ते आठ पट अधिक thyroid चे  आजार होतात.

4. Thyroid चे आजार कशामुळे होतात ?
thyroid च्या आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या factors चं  तीन भागात वर्गीकरण करता येईल.
1.    Genetic factors  म्हणजे अनुवांशिक कारणे
2.    Environmental म्हणजे वातावरणातील बदल
3.    Lifestyle factors म्हणजे जीवनशैलीतील बदल
या शिवाय दोन महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं आहे, nutrient deficiency आणि दुसरं आहे auto immune diseases थोडसं सविस्तर समजून घेऊ.
Nutrient deficiency म्हणजे शरीरातील काही घटकांची कमतरता. यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे आयोडीन. त्याच्या जोडीला झिंक आणि सेलेनियम यांचा रोल देखील तितकाच महत्वाचा आहे. दुसर कारण आहे auto immune diseases.

_MPC_DIR_MPU_II

तुम्ही TV च्या जाहिराती बघून  thyroid आणि आयोडाईज्ड मीठ यांचा काय संबंध आहे असा प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर नीट ऐका.

thyroid ग्रंथी तिचे कार्य योग्य पद्धतीने करण्यासाठी आयोडीनची गरज असते. आपण घेतलेल्या आहारातून आयोडीनचे अंश वेचण्याचे काम पूर्ण शरीरातील फक्त thyroid च्या पेशीच करू शकतात. आहारातून शरीरात गेलेल्या आयोडीनचे thyroid harmone मध्ये रुपांतर करणे हे thyroid gland चे काम.

5. Thyroid gland काय करत ?
शरीरात असलेल्या amino acid पैकी tyrosine नावाचे प्रोटीन आणि हे आयोडीन यांच्या पासून T3 आणि  T4 ही हार्मोन्स तयार करतं.
आयोडीनची शरीराला  फार कमी प्रमाणात आवश्यकता असते, पण असते. एकाच वेळी शरीरात भरपूर आयोडीन घेऊन ठेवले आणि त्याचा नंतर शरीराने त्याचा हळूहळू उपयोग केला असं होत नाही. आपल्याला thyroid चे कार्य योग्य प्रमाणात होण्यासाठी दैनदिन आहारातून 150 मायक्रोग्राम इतकी आयोडीनची मात्रा आवश्यक आहे. ही मात्रा कमी जरी असली तरी रोजच्या रोज शरीरात जाणे आवश्यक असते. प्रत्येक वेळेला आहारातून ती योग्य मात्रेत शरीरात जाईलच असे नाही. मग ही गरज भागणार कशी ? यासाठी आपण रोज जे मीठ खातो, त्यात अत्यल्प प्रमाणात आयोडीन मिक्ष केले असते, त्याला fortification असे म्हणतात आणि त्या मीठाला fortified salt असं म्हणतात.

आता तुमच्या लक्षात आलं असेल आयोडाइज्ड salt म्हणजे अत्यल्प प्रमाणात आयोडीन मिश्रित मीठ .

6. thyroid ग्रंथीचे आजार कोणकोणते ? आणि ते कसे होतात ?
या slide मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, thyroid ही ग्रंथी गळ्यात असते, मात्र तिच्यावर कंट्रोल मेंदूतल्या hypothalamus आणि ant pitutory यांचा असतो. T3 T4 यांच production होण्यासाठी hypothalamus कडून anterior pitutory ला आणि anterior  pitutory कडून सिग्नल्स मिळणं आवश्यक असतं. thyroid च्या आजारांचं अनेक प्रकारे वर्गीकरण करता येतं, त्यामध्ये साधारणत:  slide मध्ये दिलेले आठ प्रकारचे thyroid चे आजार असतात, पण त्यातही Hypothyroidism आणि  Hyperthyroidism हे common आहेत. आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ.

Hypo म्हणजे कमी आणि hyper म्हणजे जास्त. ज्या आजारात thyroid हार्मोन्स चा प्रमाणापेक्षा कमी स्त्राव होतो, त्याला Hypothyroidism म्हणतात. तर ज्यामध्ये thyroid hormones चा स्त्राव प्रमाणापेक्षा जास्त होतो, त्याला hyperthyroism म्हणतात. म्हणजे T3 आणि  T4 हे हार्मोन्स प्रमाणापेक्षा वाढले की तो Hyperthyroidism आणि कमी झाले की hypothyroism.

7. आपल्याला thyroid चा आजार झालाय हे कसं ओळखायचं ?
या आणि उरलेल्या  इतर काही प्रश्नांची उत्तरं जाणून  घेण्यासाठी भेटूया पुढच्या आठवड्यात. आजच्या व्हिडिओ संदर्भात आपल्या काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की पोस्ट करा. पुढच्या आठवड्यात नवीन माहिती सह नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद


– डॉ. गौरी गणपत्ये

M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet
स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ
मोबाईल: 9423511070
ई-मेल: [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.