Sobat Sakhichi : सोबत सखीची – गर्भाचे लिंग कसे ठरते?

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. स्त्रिया लहरी असतात का?या विषयावरील या मालिकेतील हा ​​पाचवा​ ​भाग…


सोबत सखीची – भाग 5

 गर्भाचे लिंग कसे ठरते?

नमस्कार, क्रोमोसोम्स, जीन्स हे शब्द तुम्ही कुठे न कुठे ऐकले असतील. आई वडिलांकडून मुलांकडे अनेक गुण आणि दोष ही आनुवंशिकतेने येत असतात. यालाच आपण हेरीडिटी म्हणतो. यामध्ये क्रोमोसोम्स आणि जीन्स यांचा मोठा वाटा आहे.

आज आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. मानवी शरीर असंख्य पेशींपासुन बनले असते. मेंदू, हार्ट, लिव्हर, ​हाडे​, स्नायू या प्रत्येकात ठराविक प्रकारच्या पेशी असतात. या प्रत्येक पेशी मध्ये एक कंट्रोल रूम असते, त्याला न्यूक्लियस असे म्हणतात. पेशीच्या प्रत्येक घडामोडीचा निर्णय हा न्यूक्लियस घेतो. या न्यूक्लियसमध्ये अनेक घटक असतात, त्यापैकी एक म्हणजे क्रोमोसोम्स.

स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही शरीरात प्रत्येक पेशीत क्रोमोसोम्सच्या २३ जोड्या असतात. त्यातील २२ जोड्यांना म्हणजेच ४४ क्रोमोसोम्सना autosomes म्हणतात तर एक जोडी म्हणजे दोन क्रोमोसोम्स सेक्स क्रोमोसोम्सची असते. स्त्रियांमध्ये XX ही सेक्स क्रोमोजोमची जोडी असते तर पुरुषांमध्ये XY ही सेक्स क्रोमोसोम ची जोडी असते.

Autosomes हे शरीराचे इतर गुणधर्म म्हणजे ऊंची, वर्ण, डोळ्यांचा रंग, काही विशिष्ट सवयी यासारखे गुणधर्म आई वडिलांकडून मुलांकडे येण्याच्या कामी मदत करतात. तर सेक्स क्रोमोसोमची जोडी गर्भातल्या बाळाचे लिंग ठरवते. प्रत्येक क्रोमोसोम्सवर जीन्स असतात. क्रोमोसोम आणि जीन्स यांचा संबंध आणि मानवी जीवनात असलेले महत्व समजावून घेण्यासाठी एका गजर्‍याच उदाहरण घेऊ.

वेगवेगळ्या रंगीत फुलांचा एक गजरा म्हणजे एक क्रोमोसोम मानला, तर त्यातल एकेक फुल म्हणजे एकेक जीन आहे. प्रत्येक फूल जसं वैशिष्ट्यपूर्ण असतं, त्याची स्वतंत्र अशी ओळख असते, तसा प्रत्येक जीन वैशिष्ट्यपूर्ण असतो आणि तो त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य नमूद करणारा असतो. जस एका गजर्‍यात असंख्य फुलं असतात, तसं एका क्रोमोसोम मध्ये असंख्य जीन्स असतात म्हणजे काही हजारात. गजर्‍याचा दोरा जसा प्रत्येक फुलला गुंफून ठेवतो, तसा DNA strand प्रत्येक जीन ला बांधून ठेवतो.

प्रत्येक गजरा बारकाईने बघितला तर वेगवेगळ्या रंगांची फुलं गुंफण्याचा सिक्वेन्स आणि दोरा बाधण्याची हातोटी प्रत्येक कारागिराची वेगळी असते, त्यामुळे तिचे वैविध्य आणि वैशिष्ट्य दोन्ही टिकून राहते. तसेच प्रत्येक जीनच्या स्वतंत्र ​गुणधर्मामुळे ​प्रत्येक व्यक्ति वेगळी उठून दिसते.

सर्व गुण आणि दोषांसकट स्त्री बीज आणि पुरुष बीज यांच्या संयोगाने गर्भधारणा होते आणी यातील काही गुण तर काही दोष जन्माला येणार्‍या बाळामध्ये दिसतात. स्त्रीयांमध्ये XX ही सेक्स क्रोमोसोम्स ची जोडी असते, तर पुरुषांमध्ये XY ही सेक्स क्रोमोसोमची जोडी असते.

गर्भधारणेच्या पूर्वी स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांच्या पेशींमध्ये विभाजन होते. एका पेशीचे विभाजन होऊन दोन समान पेशी तयार होतात. दोन्ही मध्ये मूळ पेशीच्या निम्मे क्रोमोसोम असतात. म्हणजे 22 autosome आणि एक सेक्स क्रोमोसोम यांचा एक असे दोन सेट तयार होतात.

त्यातल्या स्त्रीच्या विभाजन झालेल्या प्रत्येक सेट मध्ये एक्स क्रोमोसोमच असतो. मात्र पुरुषाच्या शुक्रजंतू मध्ये पेशींच विभाजन होताना एका सेट मध्ये  X क्रोमोसोम असतो तर एका मध्ये Y क्रोमोसोम असतो. गर्भधारणेच्या वेळी आई वडिलांकडून प्रत्येकी 22 – 22 autosomes आणि सेक्स क्रोमोसोम पैकी एकेक मिळून 2 असे पुन्हा 46 क्रोमोसोम ची संख्या पूर्ण होते.

ज्या वेळी स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांच्यापासून गर्भ तयार होतो, तेव्हा तयार होणाऱ्या गर्भात सेक्स क्रोमोसोमची कोणती एक जोडी येणार हे आई वडील यांच्या पैकी कोणाच्याही हातात नसतं. त्यानुसार पेशी विभाजनामध्ये स्त्रीच्या XX पैकी एक X आणि पुरुषाच्या XY पैकी एक कोणीतरी म्हणजे X किंवा Y पैकी एक यांच्या पासून गर्भ तयार होतो.

म्हणजे त्या गर्भात 44 autosomes आणि सेक्स क्रोमोसोम ची XX अशी जोडी असेल तर स्त्री जातीचा गर्भ जन्माला येईल आणि XY क्रोमोसोम असेल तर पुरुष जातीचा गर्भ जन्माला येईल.

खरतरं आता तुमच्या लक्षात आलं असेल की जन्माला येणाऱ्या बाळाचं लिंग म्हणजे मुलगा की मुलगी हे पुरुषाच्या शुक्रजंतू मधल्या सेक्स क्रोमोसोम वरच अवलंबून आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी फक्त स्त्रीला यासाठी दोषी धरले जाते. खरतरं स्त्रीचा रोल फक्त बीज ग्रहण करणे आणि गर्भधारणा झाल्यानंतर तो गर्भ नऊ महिने गर्शाशायात सांभाळणे इतकाच असतो.

खरतरं ते होणारं मूल नऊ महिने पोटात सांभाळताना आणि डिलिव्हरी होताना तिला खूपच त्रास सहन करावा लागतो, त्यात ज्या गोष्टीसाठी ती कारणीभूतच नाही त्याचाही ठपका तिच्यावर ठेवायचा हा खूप मोठा अन्याय आहे.

पण दुर्दैवाने अजूनही बऱ्याच स्त्रियांना एकापाठोपाठ एक मुली जन्माला येत असतील तर घरच्यांच्या रोषाला सामोरं जाव लागतं.

खरतरं यात पुरुषाचाही दोष आहे असं म्हणता येणार नाही कारण त्यालाही माहिती नसतं की त्याच्या X आणि Y पैकी नक्की कोणता क्रोमोसोम गर्भधारणेत भाग घेणार आहे ते.

त्यामुळे जे नशिबाने वाट्याला आलं आहे ते हसत हसत स्वीकारावं. कारण एकवेळ मुलांना जन्म देणं त्यामानानं सोपं आहे, पण त्यांचे पालनपोषण, शिक्षण आणि standard of living मेंटेन करणे त्या मानाने खूप कठीण आहे. त्यामुळे छोटे कुटुंब सुखी कुटुंब. कसं म्हणता ?

पुढच्या आठवड्यात परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.

 

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.