Sobat Sakhichi : सोबत सखीची – मैं और मेरे पिंपल्स

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. मैं और मेरे पिंपल्स… या विषयावरील या मालिकेतील हा​ ​नववा​ ​भाग…


सोबत सखीची – भाग 9

मैं और मेरे पिंपल्स

मै और मेरी तन्हाई दोनो जब आईने के सामने होते है….तब क्या करते है? खुद का चेहरा निहारते है यार …..येस्स .. स्त्री असो वा पुरुष, टीन एजर असो वा प्रौढ आपल्या चेहऱ्याच्या बाबतीत प्रत्येक व्यक्ती sensitive असते, beauty conscious असते.कुणालाही आपल्या चेहऱ्यावर एकही पिंपल किंवा एकही डाग नको असतो.

नकोशा वाटणाऱ्या पिंपल्सनी तुम्ही देखील त्रस्त आहात का? तर मग आजचा लेख / व्हिडिओ शेवट पर्यंत बघा, कारण आजच्या आणि यापुढच्या काही लेख / व्हिडिओ मध्ये आपण एकंदरीत स्त्री आणि पुरुष यांच्या पिंपल्सबद्दल, स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी येणार्यात पिंपल्सबद्दल, पिंपल्सची कारणं, त्यांचे प्रकार, त्यावर उपलब्ध असलेले उपाय या सर्वांबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत….. लेख सुरु करण्या आगोदर एक छोटीशी आठवण…. सोबत सखी ची या चॅनेल ला सबस्क्राईब करण्याची… आणि हा, पुरुषांनीदेखील हा व्हिडिओ आवर्जून बघावा कारण त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती खूप महत्वाची आहे.

Acne हे पिंपल्स चे दुसरे नाव. तारुण्यावस्थेत सर्वात जास्त पिंपल्स येतात. म्हणूनच तर त्यांना आपण तारुण्य पिटिका असेही म्हणतो ना.पिंपल्स वर अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. त्या सर्वांची आपण माहिती करून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्या फेशियल स्कीन ची थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेऊ. कारणचेहर्यााची स्कीनआणि शरीराच्या इतर भागावरची स्कीन यामध्ये काही बेसिक फरक आहेत.

चेहऱ्याच्या त्वचेचा thickness शरीराच्या इतर भागपेक्षा फारच कमी असतो. कारण चेहऱ्याच्या त्वचेखाली fat चा लेयर खूप पातळ असतो. त्यामुळे वयोमानांनुसार चेहऱ्या​वर सर्वात लवकर सुरकुत्या पडतात. पापण्याची स्कीन सर्वात पातळ 0.5 एमएम पेक्षाही कमी तर तळहात आणि तळपायांची स्कीन सर्वात जाड 1.5 मी मी पेक्षाही जास्त असते. त्यातही फक्त चेहर्यीच्या वेगवेगळ्या भागांवरच्या स्किनच्या thickness मध्येही फरक असतो. चेहऱ्याच्या स्कीनवर ऑइल ग्रंथीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे चेहरा इतर भागपेक्षा जास्त oily आणि शाईनी दिसतो. अंगावरच्या इतर त्वचेपेक्षा ​चेहऱ्याची त्वचा सर्वात जास्त वेळा सूर्यप्रकाश, धूळ,chemicals यांना expose होते. चेहर्यारची त्वचा इतर भागांपेक्षा जास्तsensitive असते.

एक युनिट चेहऱ्याच्या भागामध्ये body पेक्षा जास्त hair follicles असतात. त्यामुळे hair follicles block होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त… म्हणूनच acne अर्थात पिंपल चे प्रमाण चेहऱ्यावर सर्वाधिक असते.

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचे तीन लेयर असतात. सर्वात वरचा स्तर इपिडर्मीस, त्याच्या खाली dermis आणि सर्वात खालचा hypodermis. या epidermis च्या सर्वात खालच्या स्तरात सतत नवीन पेशींची निर्मिती होत असते, आणि त्या पेशी खालून वरच्या स्तरावर आतून पुढे ढकलले जातात. त्वचेच्या सर्वात वरच्या स्तरात मेलेल्या पेशी असतात. या सर्वांसाठी 28 दिवसांचा कालावधी लागतो. म्हणून चेहर्या वर काहीही ट्रीटमेंट केली तर त्याचा रिझल्ट येणायसाठी किमान एक ते दीड महिन्याची वाट बघितली पाहिजे.

Epidermisच्या खालचा स्तर आहे dermis. या लेयर मध्ये रक्त वाहिन्या, घाम येणार्याr ग्रंथी, केसांची मुळं आणि सिबेशियस glands अशा विविध ग्रंथी असतात. Hypodermis हा fat चा लेयर आहे, आणि स्कीन चे टेंपरेचर maintain ठेवणे आणि वरच्या लेयर्स ना न्यूट्रिशन पुरवणे हे त्याचे महत्वाचे कार्य असते.

सिबेशियस gland ही शरीरातील ग्रंथी आहे जी केसाच्या मुळाशी ओपन होते ज्याच्यातून सीबम नावाचा एक oily पदार्थ secret होतो जो केसांना आणि त्वचेला आवश्यक तो oily पणा देतो. पण कधी कधी हे सीबम अति प्रमाणात स्रवते आणि वरून काही कारणामुळे plug होऊन जाते. अशा वेळी वेगवेगळ्या प्रकारचे acne बघायला मिळतात. हे पिंपल्स चेहर्या सोबतच गळा, मान, छाती, पाठीचा भाग या ठिकाणीही काही प्रमाणात बघयला मिळतात.

Black heads आणि white heads हे नेहमीच्या बघण्यातले पिंपल्स चे सौम्य प्रकार. यांनाच non inflammatory acne असेही म्हणतात. म्हणजे त्यांच्यात कधी पस कलेक्शन होत नाही, किंवा त्याला सूज येत नाही पणPapule, Pustule आणि Nodule हे उत्तरोत्तर severe प्रकार. यांनाचinflammatory acne असेही म्हणतात कारण यांच्या ठिकाणी लालसरपणा, सूज, तसेच दुखण्याचे प्रमाण देखील जास्त असते. त्वचेवरचे opening ब्लॉक होऊन सीबम त्याच्या ग्रंथीत अति प्रमाणात साठते आणि त्यात जंतुसंसर्ग झाल्यास पिवळ्या रंगाचा पस तयार होतो. बरेचदा जाणतेपणी किंवा आजाणतेपणी पस तयार होण्याआधी आपल्याकडून ते फोडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे चेहर्यारवर मोठा खड्डा पडतो.

आपल्या त्वचेचा type कोणता हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ब्लोटिंग पेपर किंवा सॉफ्ट टिशू पेपर च्या साह्याने आपल्या त्वचेचा टाईप कोणता घेता येतं. dry स्कीन, oliy, नॉर्मल आणि combination स्कीन असे प्रकार असतात.चेहरा जर आतून खूप tight वाटत असेल, तर स्कीन dry असते. नाकाच्या टोकावर आणि कपाळपट्टी वर ज्याला T zone असेही म्हणतात, त्या भागावर तेलकटपणा असेल तर नॉर्मल स्कीन आणि T zone म्हणजेच नाक, कपाळपट्टी सोबतच c zone म्हणजेच गालांच्या पृष्टभागावर तेलकटपणा दिसत असेल तर oily स्कीन असे ढोबळमानाने वर्गीकरण करता येईल.

पिंपल्स बद्दल अजून माहिती आपण पुढच्या लेखामध्ये / व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत, पण आज काही हेल्थ टिप्स –

  1. त्वचेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त तेलकटपणा निर्माण होत असेल तर दिवसातून दोन वेळा चेहरा पाण्याने कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा.
  2. धुवून झाल्यावर चेहरा स्वच्छ napkin ने टिपून घ्यावा. टॉवेल ने जोरजोरात घासू नये.
  3. अंगाला लावण्याचा साबण चेहर्याचसाठी वापरू नये, कारण दोघांच्याही texture मध्ये फरक आहे.
  4. आहारात अत्यधिक प्रमाणात तेलकट, मसालेदार पदार्थांचा वापर करू नये. ताजी फळे,भाज्या, कोण्ड्यासकट धान्यांचा वापर करावा.
  5. constipationहोणार नाही असा भरपूर फायबर युक्त आहार घ्यावा.
  6. प्रखर सूर्यप्रकाशात कारणाशिवाय जाणे टाळावे.
  7. एक घरगुती उपाय … चेहर्या ला हळकुंड, जायफळ आणि बदाम यांचा दिवसातून एकदा किंवा दोनदा कच्च्या दुधात उगाळून लेप लावावा.

यामुळे चेहर्यानवरचे डाग कमी व्हायला मदत तर होतेच पण चेहरा तरतरीत आणि तजेलदार होतो. भरपूर पाणी प्यावे. किडनी वर ताण येणार नाही, याची काळजी घेऊन भरपूर पानी प्यावे. त्यामुळे शरीरतली प्रत्येक पेशी हायड्रेटेड राहते, शरीरतली विषद्रव्ये शरीराबाहेर पडायला मदत होते आणि चेहरा छान फ्रेश आणि तुकतुकीत दिसतो.

तर हा होता पिंपल्स विषयी महितीचा भाग पहिला… तुमच्यासाठी दोन प्रश्न, पहिला टीन एज acne आणि हार्मोनल acne यात काय फरक आहे? स्त्री आणि पुरुष यांच्या पिंपल्स मध्ये काही फरक असतो का ? आणि काय असतो ? या दोन प्रश्नांची उत्तरे आणि नवीन माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात … तोपर्यंत धन्यवाद.

टीप – सोबतच्या व्हिडिओ ची लिंक open करून हा video तुम्ही सोबत सखी ची या YOUTUBE वर बघू शकता. स्त्रियांच्या आरोग्यविषयी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला subscribe करायला विसरू नका.

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.