Sobat Sakhichi : सोबत सखीची… PCOD आणि फिटनेस

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. PCOD आणि फिटनेस या विषयावरील हा​ बाविसावा ​भाग…

 


सोबत सखीची – भाग 22

PCOD आणि फिटनेस 

नमस्कार सोबत सखीची या यू ट्यूब चॅनेल वर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते, मी आहे आपली सखी डॉक्टर गौरी. आज आपण आपली फिगर फिगरमध्ये आहे काय हे कस शोधायच ? यांचे काही शास्त्रीय ठोकताळे जाणून घेऊ. आपण जेव्हा एखाद्या तरुण मुलीला, स्त्री ला किंवा कोणालाही जाड किंवा बारीक म्हणतो, ते कशाच्या आधारावर म्हणतो ? आपले साधारण काही criteria असतात. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला डोळ्यांना जाड दिसते, त्या व्यक्तीच्या वयाच्या इतर स्त्री किंवा पुरुषांच्या तुलनेत तिचं वजन जास्त आहे असं आपल्याला वाटतं. आपल्याला डोळ्यांना असं जाणवत रहातं की त्या व्यक्तीच्या काही विशिष्ट भागामध्ये म्हणजे छाती, पोट, दंड आणि कंबर या सारख्या भागांमध्ये fat साठलेलं आहे. थोडक्यात आपल्या डोक्यात आणि डोळ्यांसमोर वेगवेगळ्या मॉडेल्सच्या फिगर बद्दल ज्या काही संकल्पना असतात,त्या संकल्पनेच्या साईजपेक्षा अधिक असेल तर ती व्यक्ति जाड आणि कमी असेल तर बारीक म्हणतो.

फिगर म्हणजे आपल्या भाषेत शरीराचा फॉर्म आणि फिगरचा अर्थ आकडे असा होतो. जेव्हा शरीराचा फॉर्म beauty contest मधल्या फिगर्स च्या criteria मध्ये बसतो, तेव्हा आपण ती व्यक्ती shape मध्ये किंवा फिगर मध्ये आहे असं म्हणतो. पण आरोग्याच्या दृष्टीने एखादी व्यक्ती जाड किंवा बारीक म्हणण्याचे criteria काय हे आपल्याला माहीत आहे काय ? आज तीन महत्वाच्या टर्म्स उपयोगात आणल्या जातात, आज त्या आपण जाणून घेऊया. आणि या मेजरमेंट्सचा उपयोग करून PCOD पेशंट मध्ये treatment कशी करायची याची थोडीशी पूर्वतयारी या video मध्ये करू.

पहिली एक महत्वाची टर्म आहे BMI अर्थात body mass index. हा इंडेक्स कसा काढायचा ते पाहू. मात्र यासाठी आपलं वय 20 वर्षांपेक्षा अधिक असायला हवं. यासाठी आपलं वजन किलोग्रॅममध्ये मोजायचं तर उंची मीटरमध्ये मोजायची. आपल्या वजनाला आपल्या उंचीच्या वर्गाने भागल्यावर जो आकडा येतो, त्याला BMI म्हणतात. या formula नुसार 18.5 ते 24.9 या रेंज मध्ये BMI असेल तर तो नॉर्मल मानला जातो. हा 18.5 पेक्षा कमी असल्यास underweight मानला जातो म्हणजे त्या व्यक्तीला बारीक म्हणले जाते. आणि 24.9 पेक्षा अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल म्हणले जाते. आकड्यांच्या रेंज नुसार स्थूल व्यक्तीला overweight, ग्रेड one obese, ग्रेड 2 obese आणि ग्रेड 3 obese असे म्हणले जाते. हाय BMI आणि Low BMI दोन्ही आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात. हाय BMI असलेल्या व्यक्तीला हार्ट डिसीज, डायबेटीस, तरुण मुलींच्या बाबतीत PCOD आणि काही प्रकारचे कॅन्सर उदाहरणार्थ ब्रेस्ट cancer, कोलोन cancer, होण्याची शक्यता असते. तर लो BMI अर्थात अति बारीक असणे हे देखील आपले आरोग्य चांगले नसल्याचे द्योतक असते. अति बारीक असलेल्या व्यक्तींची immune system weak असण्याची शक्यता असते. तसचं त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे nutritional अनेमिया त्यातही iron deficiency anemia असण्याची शक्यता जास्त असते.

दुसरी टर्म आहे, IBW म्हणजेच आयडियल body weight. म्हणजेच आपल्या उंचीच्या प्रमाणात आपल्या शरीराचे वजन आहे की नाही ? हे पडताळून पहाणे. प्रमाणात असलेलं वजन हार्ट डिसीज, स्ट्रोक, डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर आणि इतकंच कशाला काही प्रकारच्या cancer पासून बचाव करते. आपलं IBW अर्थात आयडियल body weight किती असलं पाहिजे हे एकदा कळलं की आपण त्याच्यापासून किती दूर आहोत हे आपल्याला कळतं आणि realistic goals set करायला त्याची मदत होते. IBW किती असावा याचे अनेक formulae आहेत, या formula नुसार पुरुषांसाठी सर्वसाधारणपणे सेंटीमीटर मध्ये उंची मोजून त्यातून 100 वजा केल्यास आणि स्त्रियांसाठी सेंटीमीटर मध्ये उंची मोजून त्यातून 105 वजा केल्यास जी फिगर येते ते त्यांच्यासाठी असलेले IBW. असाच अजून एक quick formula. 22 BMI असण्यासाठी किती वजन हवे, ते आपले IBW. म्हणजे 150 सेंमी उंची असणाऱ्या एका स्त्रीचे वजन किती हवे ? तर या formula नुसार . . पण मग याचा अर्थ असा होतो की एकाच उंचीच्या सर्व स्त्रियांचे आणि एकाच उंचीच्या सर्व पुरुषांचे IBW सेमच असले पाहिजे; पण प्रत्यक्षात असं होत नाही. म्हणून मग ज्यावेळी अगदी काटेकोरपणे वजन कमी करणे गरजेचे असते त्यावेळी काटेकोर फोर्मुलांचा आधार घेतला जातो. आणि त्यावेळी वय, अनुवांशिकता, शरीराचे overall fat distribution या सर्वांचा विचार करावा लागतो. शरीराच्या शेप नुसार fat चे distribution बदलते. त्यात पुन्हा foreign country मधल्या आणि भारतामधल्या लोकांची शारीरिक ठेवण यामध्ये फरक असल्याने हे सर्व फोर्मुले थोडे modify करावे लागतात. असाच एक formula…थोडा किचकट आहे पण अनेक factors चा विचार करून डिझाईन केला आहे. हे तिन्ही फोर्मुले एकमेकांशी compare केले तर तीन ते चार किलो इकडे तिकडे फरक नक्की पडतो, पण आपल्याला आपल टार्गेट वजन ठरवण्यासाठी, आपल्या obesity चा आणि रिस्क फॅक्टर्स चा अंदाज घेण्यासाठी याचा नक्की फायदा होतो. आणि पुन्हा सर्वात महत्वाचं, आपल्या स्वतःला आतून किती healthly वाटतय, इतर कुठली आजारपण नाहीत ना, आपली immunity कशी आहे, हे महत्वाचं.

तिसरी एक महत्वाची फिगर आहे waist hip ratio. हा कसा calculate करायचा ? अगदी साधं आहे, आपल्या waist च्या measurement ला आपल्या hip च्या measurement ने भागले असता जो आकडा येतो, त्याला आपला waist hip ratio म्हणतात. ती फिगर स्त्रीयामध्ये 0.85 पेक्षा जास्त असण आणि पुरुषांमध्ये 1 पेक्षा जास्त असणं ही धोक्याची घंटा आहे. waist hip ratio काय दर्शवत? तर शरीराचे fat distribution कसे आहे, हे दर्शवत. waist म्हणजे आपल्या बरगड्या जिथे संपतात immediate तिथला भाग…आणि hip म्हणजे आपल्या कमरेचा सर्वात रुंद भाग. हाय waist hip ratio हृदय रोग, डायबेटीस, infertility इत्यादी रोगांना आमंत्रण देणारा असतो.

आयुर्वेदानुसार health ची व्याख्या करताना शरीर प्रमाणात असण्याला जितकं महत्व आहे, तितकंच ते निरोगी असण्याला देखील महत्व आहे. आणि नुसतं शरीर निरोगी असून चालत नाही, मन देखील निरोगी, आनंदी आणि सदा प्रसन्न हवं.

एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की IBW, BMI आणि WHR यांच्या फिगर beauty फिगर्स नाहीयेत, तर त्या health figures आहेत. म्हणजेच healthy व्यक्तींनी या figures च्या जवळपास रहाण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आरोग्याचे शत्रू शरीरापासून दूर ठेवण सोपं जातं. जर अन्य काही रिस्क factors नसतील तर या figures च्या रेंज मध्ये रहाण्याचा प्रयत्न करावा. शरीरासोबत मनही महत्व मग चला तर पटापट कागद पेन्सिल घ्या आणि या सर्व formula मधून आपलं अंदाजे IBW काढा athletes चा किंवा जनरल स्पोर्ट्स persons चा विचार केला तर व्यायामाच्या सरावामुळे आणि ठराविक पॅटर्न च्या आहारामुळे त्यांची फिगर beauty फिगर पेक्षा आणि हेल्थ फिगर पेक्षाही कमी असते, पण त्यांचा performance आणि स्टॅमिना प्रचंड वाखणण्यासारखा असतो. आपणही आपल्या आत्ताच्या फिगर्स आणि आपल्याला healthy ठेवणार्‍या फिगर्स यात काही ताळमेळ साधता येतोय का ते प्रयत्न करून बघूया. तर मगघ्या आपल्या मेजरमेंट्स, काढा कागद पेन….पुन्हा एकदा नव्याने हा video बघा, स्वत: ला assess करा आणि आपल्या फिगर्स काय सुचवतात, ते बघा.

Obese PCOS, lean PCOS आणि healthy person या सर्वांसाठी कॅलरी calculation, diet आणि एक्झरसाइज यांचा विचार कसा करायचा हे पाहू पुढच्या आठवड्यात, तोपर्यंत धन्यवाद.

– डॉ. गौरी गणपत्ये
M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet
स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ
मोबाईल: 9423511070
ई-मेल: [email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.