Sobat Sakhichi : सोबत सखीची… PCOD आणि त्याची लक्षणं, कारणं व उपाय

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. PCOD आणि त्याची लक्षणं, कारणं व उपाय या विषयावरील हा​ विसावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 20

PCOD आणि त्याची लक्षणं, कारणं व उपाय

नमस्कार, सोबत सखीची या यू ट्यूब चॅनेल वर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते, मी आहे. आपली सखी डॉक्टर गौरी. आजकाल तरुण मुलींमध्ये PCOD चं प्रमाण खुपच वाढायला लागले आहे. तुम्हाला जर स्त्रियामध्ये होणार्‍या PCOD बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आजचा video शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला subscribe जरूर करा. स्त्रियांच्या आरोग्या संदर्भात तुम्हाला जर एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास आवर्जून मला सांगा, मी नक्की त्यावर video बनवेन. आता अधिक वेळ खर्च न करता आजच्या video ला सुरुवात करूया.

बरेचदा तरुण मुलीची मासिक पाळी नियमित येत नाही म्हणून किंवा अन्य कारणांसाठी म्हणून सोनोग्राफी करण्यास सांगितले जाते आणि त्याच्या रिपोर्ट्समध्ये both ovaries appear bulky and show polycystic pattern किंवा सरळ polycystic ovaries असे लिहिले असते. हे finding आजकाल खूप कॉमन आहे. यालाच मेडिकल terminology मध्ये PCOD म्हणतात. आकडेवारी वरुन असे समजते की, दर पाच मुलींच्या मागे एका मुलीला PCOD चा त्रास असतो. काही जण त्यालाच PCOS असेही म्हणतात.PCOD म्हणजेच polycystic ovarian disease आणि PCOS म्हणजे polycystic ovarian syndrome.

Poly म्हणजे अनेक आणि cyst म्हणजे पाण्याच्या गाठी. अशी condition, ज्यात ovary मध्ये अनेक छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी तयार होतात, त्याला polycystic ovaries असे म्हणतात. प्रत्येक तरुण मुलीमध्ये दर महिन्याला पाळीच्या मध्यावर म्हणजे चौदा पंधराव्या दिवशी एक परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडतं, चोवीस तास जिवंत राहतं आणि त्या चोवीस तासात गर्भधारणा झाली नाही तर ते मरुन जात, म्हणजेच त्याची प्रजोत्पादन करण्याची क्षमता चोवीस तासांनंतर संपून जाते. मग उरलेल्या चौदा पंधरा दिवसात ते मेलेलं स्त्रीबीज गर्भाशयात येऊन गर्भाशयाच्या आतल्या त्वचेसोबत मासिक पाळीच्या स्वरुपात शरीराच्या बाहेर पडतं. ही दर महिन्याला होणारी नॉर्मल क्रिया PCOD मध्ये बिघडली असते. आपण बघूया, बिघडलेली असते, म्हणजे नेमकं काय होतं?

जन्माच्या वेळी साधारण एक million स्त्री बीज सूक्ष्म रूपात Ovary मध्ये साठलेली असतात. वेगवेगळ्या स्तरांवर त्याची development होत असते. त्यापैकी सुमारे 3,00,000 स्त्रीबीज ती स्त्री तारुण्यावस्थेत पोहोचेपर्यंत शिल्लक रहातात. Reproductive age ग्रुप मध्ये म्हणजे मासिक पाळी सुरु झाल्यापासून मासिक पाळी बंद होण्याच्या कालावधीत एका स्त्रीची साधारण 400 वेळा मासिक पाळी येते.

एका मासिक पाळीच्या वेळी एक मेलेल स्त्रीबीज मासिक पाळीच्या स्त्रावासोबत बाहेर पडतं. PCOD मध्ये मात्र हे स्त्रीबीज तयारच होत नाही, म्हणजे mature च होत नाही, त्या ऐवजी immature अवस्थेतील स्त्रीबीजांच्या छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी तयार होतात. म्हणजेच स्त्री बीजाची पुरेशी development होत नाही. आणि ज्यांच्यात स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रियाच नीट होत नाही, त्यांच्यात मासिक पाळीचे चक्र देखील बिघडलेल असतं. इतकच नव्हे तर त्यांच्यात गर्भधारणा देखील उशिरा होण्याची शक्यता असते किंवा काही जणीमध्ये गर्भधारणा रहातही नाही.

पण तरीही सोनोग्राफी मध्ये PCO म्हणजे polycystic ovaries हे finding असलं तरी ती केस क्लासिक PCOS ची असेलच असे नाही. जेव्हा आपण सिंड्रोम म्हणतो, तेव्हा ते अनेक लक्षणांच मिश्रण असतं. PCOS मध्ये देखील अनेक लक्षणं एकाचवेळी उपस्थित असतात

PCOS चं निदान आपण तीन स्तरांवर करू शकतो. पहिला स्तर आहे शारीरिक लक्षण यापैकी काही जणींमध्ये सर्वच्या सर्व लक्षणे दिसतात, तर काही जणींमध्ये एखाद दोनच लक्षण दिसतात. त्यातही काही जणीमध्ये लक्षणं खूप सौम्य दिसतात तर काही जणींमध्ये खूप तीव्र असतात. यामध्ये वाढलेलं वजन म्हणजेच obesity, मासिक पाळीची अनियमितता, डिप्रेशन मूड, डोक्यावरचे केस कमी होणे मात्र चेहर्‍यावर आणि अंगावर अधिक लव येणे, पिंपल्स अधिक प्रमाणात येणे, मानेवर काळसरपणा येणे, त्याच्यासोबतच डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर यांचा त्रास असणे अशी लक्षण असू शकतात.

आपण या लक्षणाचा समुदाय बघून PCOS ची शंका मनात घेऊ शकतो आणि आपलं निदान कन्फर्म करण्यासाठी दुसर्‍या स्तराची मदत घेऊ शकतो. यातल्या दुसर्‍या स्तरात सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीमध्ये ovary मध्ये बाहेरच्या साइड ला असंख्य छोट्या छोट्या cysts म्हणजे पाण्याने भरलेल्या गाठी दिसतात. त्याला typically क्वीन’स नेकलेस असे म्हणतात. जेव्हा ovary मध्ये 2 ते 9 मिमी साईज चे 10 ते 12 पेक्षा जास्त follicles असतात तेव्हा PCO अर्थात polycystic ovary अस लेबल केलं जातं. असा typical PCO पॅटर्न असेल तर लक्षणाच्या severity नुसार तिसर्‍या स्तरावर काही लॅब tests करून घेतल्या जातात. यामध्ये रक्ताचे sample घेऊन हार्मोन्स च्या काही तपासण्या केल्या जातात.

यामध्ये पहिला सेट आहे pituotoryहॉर्मोन्स चा म्हणजेच FSH,LH आणि Prolactin चा ज्याची तपासणी पाळीच्या दुसर्‍या दिवशी केली जाते.

दूसरा सेट आहे,Thyroid हॉर्मोन्स चा. यामध्ये T3, T4, TSH आणि आवश्यकता वाटल्यास thyroid antibodies ची तपासणी केली जाते.

तिसरा सेट आहेfemale हॉर्मोन्स oestrogen आणि progesterone चा. यांच्या बिघडलेल्या लेव्हल्स मासिक पाळी आणि ovulation चं चक्र बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात.

चौथा सेट आहे androgens चा म्हणजेच male हॉर्मोन्स चा. ज्यांच्यामध्ये चेहर्‍यावर जास्त लव असते, अंगावर पुरुषांप्रमाणे दाट केस असतात, त्यांच्या मध्ये male हॉर्मोन्स च्या levels वाढलेल्या असतात. testesteron आणि फ्री testesteron,SHBG, DHEA, यासारख्या male हार्मोन्सच्या लेव्हल्स तपासल्या जातात.

याशिवाय डायबेटीस आणि insulin resistance detect करण्यासाठी fasting आणि पीपी शुगर,fasting insulin levels तर obesity आणि हायपर टेंशन असेल तर Lipid profile यासारख्या अनेक तपासण्या केल्या जातात.

थोडक्यात काय, लक्षणाच्या severity नुसार आपल्याला निदान कन्फर्म करण्यासाठी अनेक त्पासण्या उपलब्ध आहेत. तसेच अनेक ट्रीटमेंट options देखील आहेत, जे आपण सविस्तरपणे पुढच्या विडियो मध्ये बघणारच आहोत. पण त्यापूर्वी PCOS ची कारणं काय हे आधी पाहू.

PCOS किंवा PCOD हा आजार हल्ली खूपच कॉमन झालाय, असं का होतं म्हणजे हा आजार एवढा कॉमन का होतोय, याची कारणं खूप interesting आणि तितकीच shocking आहेत आणि आताच्या life style शी निगडीत आहेत.

आपण सर्वच जण हे मान्य कराल की आताची life स्टाइल खूपच sedentary आहे, म्हणजे बैठे काम करणार्‍याची संख्या खूप वाढली आहे. अगदी शाळेच्या काळात पूर्वी दमछाक होईपर्यंत जसं खेळल जायचं, तसे खेळ आताची पिढी खेळत नाही, त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे स्थूलता वाढलेली असते. आपलं लाइफ फास्ट आणि stressful झालय, सोशल मीडियामुळे रात्रीच्या जागरणाच प्रमाण वाढल आहे, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल वाढायला लागलाय. आणि आपल्या हार्मोन लेव्हल्स सुद्धा बिघडायला लागल्या आहेत.

जंक फूड आणि फास्ट फूड च्या आवडीपायी हाय कॅलरी फूड चे अधिक सेवन होते. यामध्ये nutrients फार कमी आणि शरीराला हानिकारक असे ट्रान्स fat अधिक प्रमाणात शरीरात जात असल्यामुळे असा आहारकोलेस्टेरोल वाढवण्याचा आणि हार्टसाठी धोकादायक ठरण्याचा शक्यता खूप जास्त असते. आर्थिक सधंनता वाढल्यामुळे, सोशल gathering, hoteling यांचे प्रमाण वाढल्यामुळे सतत sweets आणि हाय कॅलरी फूड चे प्रमाण आहारात वाढायला लागलाय आणि त्यामुळे स्थूलता, डायबेटीस,ब्लड प्रेशर यांनी फार लवकर आपल्या आयुष्यात एंट्री घेतली आहे

आजकालच्या तरुण मुलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कॉस्मेटिक्स वापरण्याकडे कल खूपच वाढला आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल लिपस्टिक्स, बॉडी lotions, शॅम्पू यामध्ये लेड, paraben, थालेट्स, synthetic fragranceयासारखी काही हानिकारक केमिकल्स असतात ज्यामुळे स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत असलेल्या हार्मोन्स चा बॅलेन्स बिघडतो आणि त्याची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. इतकच कशाला, प्लॅस्टिकचे containers, भाज्या, फळ यावर मारली जाणारी कीटक नाशक या सगळ्यांमधुन देखील असेच दुष्परिणाम पाहायला मिळतात. हे सगळं पाहून आणि ऐकून आता आपल्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की मग आताच्या काळात जगायच तरी कस ?

खरी आहे तुमची शंका. बदललेल्या आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे PCOS ची ट्रीटमेंट नुसती औषध गोळ्या देऊन भागत नाही, यासाठी पूर्ण लाइफ स्टाइल चेंज करावी लागते. आहार, व्यायाम, जीवनशैली, विचारप्रणाली या सर्व पातळ्यांवर बदल घडवायला लागतात, त्याबद्दल संपूर्ण माहिती पुढच्या आठवड्यात पाहू. तोपर्यंत आजचा विडियो कसा वाटला ते मला नक्की सांगा, आवडला तर लाइक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका. पुढच्या आठवड्यात नवीन महितीसह भेटू, तोपर्यंत धन्यवाद.

– डॉ. गौरी गणपत्ये
M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet
स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ
मोबाईल: 9423511070
ई-मेल: [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.