Sobat Sakhichi : सोबत सखीची… PCOD आणि त्याची ट्रीटमेंट

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. PCOD आणि त्याची ट्रीटमेंट या विषयावरील हा​ एकविसावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 21

PCOD आणि त्याची ट्रीटमेंट

नमस्कार सोबत सखीची या यू ट्यूब चॅनेल वर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते, मी आहे आपली सखी डॉक्टर गौरी. मागच्या आठवड्यात PCOS ची बेसिक माहिती घेतल्यानंतर आज आपण वळणार आहोत PCOS च्या ट्रीटमेंट कडे. आज आपण PCOS आणि PCOS पेशंट ची मानसिकता याच्याबद्दल बोलू. विषय खूप मोठा आणि गुंतागुंतीचा आहे आणि त्याला अनेक कंगोरे आहेत, त्यामुळे अधिक वेळ खर्च न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करुया.

आपण मागच्या व्हिडिओ च्या शेवटी बोललो होतो की PCOD किंवा PCOS या आजारावर फक्त औषध गोळ्या खाऊन उपचार करता येत नाहीत, तर त्यासाठी पूर्ण लाइफस्टाईल मॅनेजमेंट करावी लागते. म्हणजे नेमकं काय करावं लागतं ते आजच्या विडियो मध्ये बघू.

प्रत्येक PCOS च्या पेशंट मध्ये लक्षणं आणि कारणं वेगवेगळी असतात, लक्षणांची severity वेगवेगळी असते. त्यामुळे PCOS सगळ्या पेशंट साठी एकच अशी रेडिमेड ट्रीटमेंट नसते, जसा एक रेडिमेड ड्रेस एकाच वयाच्या प्रत्येकीला fitting मध्ये बसेलच अस नाही, त्याचप्रमाणे PCOS ची एकच ट्रीटमेंट एकाच वयाच्या सर्वांना सारख्या प्रमाणात लागू होईल असे नाही. ही खरतर एक टेलर मेड ट्रीटमेंट आहे, प्रत्येकीच्या खासियत नुसार design केलेली. म्हणजेच तिच्यात PCOS होण्याची कारणं कोणती, तिच्यात कोणती लक्षणं दिसतात, लक्षणांची severity किती आहे, सोनोग्राफी आणि हार्मोन्स चे reports काय आहेत ? या सगळ्यांचा विचार करून तिच्यासाठी ठरवलेली ती एक personalized ट्रीटमेंट असते.

तिचं वय काय आहे ?ती काय करते ?म्हणजे तिचे education चालू आहे, जॉब करतेय की housewife आहे ? या वरुन तिच्या activity ची लेव्हल ठरवता येते. आजकाल शाळा कॉलेजच्या मुलींमध्ये अभ्यासाचे तास जास्त आणि खेळाचे तास त्यातही मैदानी खेळाचे तास खूपच कमी झाले आहेत. जॉब करणार्‍या मुलींचा preference बैठ्या कामाला अधिक असतो. शिवाय जातायेता travelling साठी ट्रेन, बस किंवा स्वत:चं vehicle वापरण्याकडे कल अधिक असतो. चाललं गेलच तर ते खूपच कमी. त्यामुळे शरीराला व्यायाम खूपच कमी होतो.

No डाऊट, housewife ही 24 hours ची duty आहे, खरतर आताच्या महागाईच्या काळात आधुनिक घरं अगदी थोडक्या जागेत आणि आटोपशीर असतात, पण तिथे देखील housewife ला exercise पेक्षा exertion जास्त असतं. घरातच सर्व कामं करणार्‍या housewife ना त्याच त्याच फॉरवर्ड bending च्या अवस्थेत त्याच त्याच muscle ना काम यामुळे कंबरदुखी पाठदुखी फार लवकरच्या वयात पाठ धरते. Overexertion मुळे exercise करायला स्टॅमिना च शिल्लक न रहाणे ही situation घर घर की कहाणी व्हायला लागलीये.

लग्नानंतर एका अर्थाने लाइफ ला stability येते. त्यात ती housewife असेल तर वेळेवर खाण पिण झोप, आर्थिक आणि कौटुंबिक stability यामुळे लाइफस्टाईल आधीच्या दगदगीच्या मानाने थोडीशी relax होते. आणि हे सगळं सुख अंगाखांद्यावर खेळायला लागतं. त्यामुळेच अशी situation face करणार्‍या लग्नाच्या आधी सडसडीत असलेल्या मुलींना लग्नानंतर किंवा एक delivery झाल्यावरही PCOS ची बाधा होऊ शकते.

बरेचदा PCOD असलेल्या तरुण मुली किंवा even स्त्रिया थोड्या obese असतात. आजकाल फिगर consciousness चा जमाना आहे. त्यात बायका मग त्या कोणत्याही वयातल्या असल्या तरी त्या beauty conscious असतात. PCOS च्या काही केसेस मध्ये चेहर्‍यावर, अंगावर लव जास्त असते. हेयर पॅटर्न पुरुषांप्रमाणे असतो. त्यामुळे त्या मनातल्या मनात कुढत राहतात. अशा कंडिशन मध्ये त्या मुलीची मानसिकता काशी आहे हे फार महत्वच असतं. मनातल्या मनात ती डिप्रेशन ची शिकार होऊ शकते. हे असलं माझ्याच वाट्याला का ? या negativity मध्ये ती इतकी खोल बुडून जाते, की घरच्या बाहेर कुणातही मिक्स व्हायचं टाळायला लागते. यामुळे नुकसान तीचच होतं. activityकमी होते आणि स्थूलपणा अजूनच वाढतो. आपली फिगर फिगर मध्ये नाही, या गोष्टीचा तिच्यावर खूप मोठा स्ट्रेस येऊ शकतो.मुळात तिच्या सौंदर्याच्या संकल्पना काय आहेत यावर तिचा स्ट्रेस factor अवलंवून आहे.

ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्यावर फोकस करण्यापेक्षा ज्या गोष्टी out of कंट्रोल आहेत, त्यावर फोकस करत राहिलं तर डिप्रेशन येणारच आहे. जेनेटिक किंवा आनुवंशिक cause असल्यास त्या बदलण जारी तिच्या हातात नसलं, तरी सौंदर्याकडे बघण्याची तिची दृष्टी क्लियर ठेवण हे नक्की तिच्या हातात आहे. चेहर्‍याचा रंग तिच्या हातात नसेल, पण चेहर्‍यावरचे तेज, डोळ्यातले तेज हे तिच्या हातात आहे. त्यात तिच्या आरोग्याची आणि तिच्या बुद्धीची चमक दिसते. त्या तेजच्या जोरावर तिच्या व्यक्तिमत्व नक्कीच चारचौघीत उठून दिसेल. त्यासाठी हे मनातून तिला पुर्णपणे पटायला हवं.

खरतर आताच्या काळात चेहर्‍यावरची लव, अंगावरची लव यांना आजकाल कितीतरी उपाय आहेत, पार्लर्स आहेत, कॉस्मेटिक थेरपी आहेत. हा काही फार मोट्ठा इश्यू राहिलेला नाहीये. आणि एक गोष्ट crystal clear आहे की सौंदर्याचा अर्थ नुसतं जे नकोसं आहे, ते झाकायच किंवा काढून टाकायच असं नसून जे चांगलं आहे, ते हायलाइट करायचं असदेखील आहे. निसर्गाने प्रत्येकाला काही न काही चांगलं दिलं आहे, गरज आहे ती फक्त शोधून काढण्याची. त्यासाठी स्वतच्या शरीरावर प्रेम करता आलं पाहिजे, ते जस आहे, तसं accept करता यायला पाहिजे. स्वत;मधले चांगले गुण ओळखता आले पाहिजेत. आणि यासाठी स्वत; कडे बघण्याची दृष्टी साफ असली पाहिजे.

आई वडिलांकडून जे मिळालं आहे, जे बदलता येणार नाहीये, त्याचा विचार करून मनातल्या मनात कुढत राहण्यापेक्षा यातलं काय बदलता येईल आणि काय improve करता येईल याचा विचार कारण जास्त चांगलं नाही का? यासाठी सकारात्मक विचारसरणी हवी.सकारात्मक विचारांसाठी आजूबाजूच वातावरण, मित्र मैत्रिणी सकारात्मक विचारांचे हवेत. एखाद्या तरुण मुलीमध्ये तिचे रिस्क फॅक्टर्स कोणतेयावरून तिची mentality काय आहे, तिची विचारसरणी काय आहे,याचा अंदाज बांधता येतो आणि off कोर्स,तिची विचारसरणी तिचे stress फॅक्टर्स ठरवते.

PCOS च्या बर्‍याच तरुण मुली obese म्हणजे fat असतात त्यांना मेडिकल भाषेत obese PCO म्हणतात पण काही जणी बारीक देखील असतात, त्यांना thin PCOS म्हणतात. दोघांमध्ये PCOS ची लक्षणं सारखीच असली, तरी कारणं वेगवेगळी असतात. आणि ट्रीटमेंट देताना त्या कारणांचा विचार करावाच लागतो. मागच्या video मध्ये आपण PCOS च्या कारणांमध्ये बैठी जीवनशैली, अॅक्टिविटी चा अभाव, हाय कॅलरी फूड खाणे या कारणांवर वर जास्त भर दिला होता, प्रत्यक्षात मात्र काही केसेस अशा आढळतात की त्या मुलींचा आहार अगदी सर्वसाधारण असतो, तरीही त्यांच्यात obesity वाढत असते. अशा केसेस मध्ये आई वडील जाड आहेत का, तिच्या अन्य बहिणी भाऊ कसे आहेत ? म्हणजे जाड आहेत की बारीक आहेत, ही स्थूलता आनुवंशिक आहे का ? त्याच्याशी related अन्य रिस्क फॅक्टर्स कोणते ? या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो.

जनरली PCOS ची लक्षण वयाच्या 15 ते 25 या phase मध्ये दिसायला सुरुवात होते, पण lifestyle शी निगडीत कारणं असतील तर त्याची बीज बालपणापासूनच रोवायला सुरुवात होतात. लहानपणापासून टीव्ही च्या समोर बसून तासन तास जेवण,ज्यामध्ये जेवणाकडे लक्ष नाही, किती जेवतो ते कळत नाही मग बरेचदा ती सिरियल किंवा प्रोग्राम संपेपर्यंत खात राहायच, अगदी लहानपणापासून बेकरी फूड, फास्ट फूड जंक फूड यांचा रोजच्या आहारात समावेश, हॉटेल मध्ये जाऊन हाय कलेरी फूड खाण्याची सवय, nutritious फूड च्या नावाखाली अति पोषण या सगळ्या गोष्टींचे दुष्परिणाम लहानपणीपासूंच साठत जातात आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर बाहेर पडतात.

टीव्ही, मोबाईल मुळे रात्री उशिरापर्यंत जागणे सकाळी उशिरा उठणे ही कॉमन लाइफस्टाईल व्हायला लागली आहे. इथून तिथे जायचं असलं तरी गाडीचा वापर या सगळ्या गोष्टींमध्ये लाइफस्टाईल disorders ची मुळं दडलेली आहेत. हे आपण रोखू शकतो का? हे रोकायला हवच आहे कारण या sedentary म्हणजे बैठ्या लाइफस्टाईल मुळेच तर शरीरात जाणार्‍या कॅलरी आणि खर्च होणार्‍या कॅलरी यांचा ताळमेळ बसत नाही आणि परिणामी शरीराचा बँक बॅलेन्स वाढायला लागतो. आणि कोंबडी आधी की अंड आधी या दुष्टचक्राप्रमाणे obesity आणि हार्मोनल imbalance यांचं दुष्टचक्र चालू रहातं.

आणि म्हणूनच PCOS ची ट्रीटमेंट करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मुळातून बदल घडवायला लागतो आणि त्याची सुरुवात आपल्या जीवनशैली आणि विचारसरणी यापासून करावी लागते. ही मानसिकता तयार करून मगच वळूया पुढच्या ट्रीटमेंट options कडे आणि ते ही पुढच्या आठवड्यात.

तोपर्यंत ज्यांनी मागचे video बघितले नसतील त्यांनी ते ही आवर्जून बघा आणि चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेल ला subscribe अवश्य करा कारण आपल्या रोजच्या आयुष्यात अनुभवायला येणार्‍या health issues ची आणि तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती हवी असल्यास त्या विषयाबद्दल मेडिकल माहिती साध्या सोप्या आणि मराठी भाषेत या चॅनेलच्या माध्यमातून माझ्या सर्व वयोगटातल्या सख्यांना देत असते.

तोपर्यंत आजचा video कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते ही मला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये पोस्ट करा. पुढच्या आठवड्यात नवीन महितीसह नक्की भेटू, तोपर्यंत धन्यवाद.

– डॉ. गौरी गणपत्ये
M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet
स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ
मोबाईल: 9423511070
ई-मेल: [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.