Sobat Sakhichi : सोबत सखीची… थायरॉईड आणि गर्भधारणा

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. थायरॉइड आजारावरील चौथा भाग Hypothyroidism विषयावरील या मालिकेतील हा​ एकोणिसावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 19

Thyroid and Pregnancy

नमस्कार. सोबत सखीची या यु ट्यूब channel वर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. मी आहे आपली सखी डॉ गौरी. थायरॉईडच्या व्हिडीओ चा हा चौथा आणि शेवटचा  भाग  आहे. त्यामुळे ज्यांनी आधीचे भाग बघितले  नाही, त्यांनी ते ही भाग नक्की बघा आणि चानेल वर नवीन असाल तर channel ला  प्लीज subscribe जरूर करा. आज आपण थायरोईड आणि प्रेग्नन्सी यांचा काय संबंध आहे आणि ज्यांना Thyroid disease आहे, त्यांनी प्रेग्नन्सी मध्ये कोणती काळजी घ्यायची या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा अधिक वेळ खर्च  न करता आपण आजच्या व्हिडीओला सुरुवात करुया.

मागच्या काही व्हिडीओ मध्ये आपण बघितलं होतं, स्त्रीबीज योग्य प्रकारे तयार होण्यात HPO axis, Thyroid gland आणि पर्यायाने thyroid hormone चा रोल फार महत्वाचा आहे. त्यामुळे thyroid hormones ची लेव्हल Hypo म्हणजे कमी असणे किंवा Hyper म्हणजे जास्त असणे या दोन्ही कंडीशन मध्ये प्रेग्नंसीवर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात adverse इफेक्ट होण्याचा धोका असतोच.

• Hyperthyroidism असेल तर प्रेग्नंसी रहायलाच मुळात प्रॉब्लेम येतो. त्यामुळे प्रेग्नसी मध्ये जनरली Hypothyroidism च्या केसेस जास्त बघायला मिळतात.

• Thyroid च्या त्रासाची लक्षणं प्रेग्नन्सीच्या लक्षणांशी मिळतीजुळती असल्यामुळे बरेचदा ही Thyroid ची लक्षणे आहेत असं लक्षातच येत नाही आणि वेळेत निदान आणि ट्रीटमेंट न झाल्यामुळे आईला आणि बाळाला दोघांनाही त्याचे दुष्परीणाम भोगावे लागतात.

आता प्रश्न असा येतो की आपल्याला प्रेग्नंसी मध्ये थायरोईडचा त्रास आहे हे ओळखायचं कसं ?
• प्रेग्नंसीच्या लक्षणांमध्ये शौचास साफ न होणे, चित्त विचलित असणं, लक्षात न रहाणे, थंड वातावरण सहन न होणे, स्नायू कमजोरी ही लक्षणे अत्यधिक प्रमाणात जाणवत असतील तर Hypothyroidism च्या शक्यतेचा विचार जरूर करायला हवा.

• त्याचबरोबर हृदयाचे ठोके जलद, डिप्रेशन वाढणे, अतिप्रमाणात उलट्यांचा त्रास, हाताला कंप जाणवणे, शांत झोप न लागणे, व्यवस्थित आहार घेऊन देखीलवजन कमी होणे / न वाढणेही लक्षणे असतील तर Hyperthyroidism ची शक्यता पडताळून पहायला हवी.

• गर्भावस्थेचे पहिले तीन महिने फारच महत्त्वाचे असतात. पहिल्या तीन महिन्यांमध्येच गर्भाच्या शरीरातील सर्व अवयवांची निर्मिती व्हायला सुरुवात होते. त्यातही मेंदूची वाढ निकोप होण्याच्या दृष्टीने गर्भावस्थेचे पहिले तीन महीने फार महत्त्वाचे असतात. आणि बाळाच्या मेंदूची आणि मज्जासंस्थेची म्हणजेच nervous system ची वाढ होण्यासाठी Thyroid hormones चा रोल फार महत्त्वाचा आहे.

• गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये बाळाची thyroid gland thyroid हॉर्मोन्सचं secretion करण्या एवढी सक्षम झालेली नसते, त्यामुळे बाळ पूर्णत: आईच्या Thyroid Hormones वर अवलंबून असतं. म्हणूनच गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये आईच्या thyroid च्या लेव्हल्स normal असणे महत्वाचे आहे.म्हणूनच डॉक्टर प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यात आईला थायरॉइड हार्मोन्सची तपसणी करण्याचा सल्ला देतात.

• आपण मागच्या दोन व्हिडीओ मध्ये Hypothyroidism आणि Hyperthyroidism यांची काय कारणं आहेत ती बघितली होती. तीच कारणं प्रेग्नन्सी मध्येही लागू पडतात. पहिल्या तिमाहीत HCG या hormoneची लेव्हल वाढलेली असते आणि त्याचा परिणाम म्हणून  T3 आणि T4 यांच्या लेव्हल्स temporarily वाढण हे नॉर्मल मानलं जातं, मात्र त्यासाठी लगेच ट्रीटमेंट सुरू करण्याची गरज नसते. दुसर्‍या तिमाहीत Iron आणि Calcium च्या गोळ्यांमुळे Thyroid च्या गोळ्यांचे absorption व्हायला अडथळा होतो.

• बरेचदा प्रेग्नन्सीच्या आधीपासून Thyroid च्या गोळ्या चालू असतील तर प्रेग्नन्सी मध्ये त्याचा डोस वाढवायला लागतो किंवा गोळ्यांची वेळ बदलावी लागते. त्यामुळे आपल्याला आधीपासून जर Thyroid च्या गोळ्या चालू असतील, तर आपणहून आपल्या डॉक्टरांना त्याची कल्पना नक्की द्या.

ही स्लाईड बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल, Hyperthyroidism असो किंवा Hypothyrodismत्याचा आईवर तसेच बाळावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता खूप जास्त असते. यामध्ये abortions, preterm delivery,  still birth आणि मतिमंद बालक यांची संख्या जास्त असते.   तुम्हाला जर Detail माहिती हवी असल्यास तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर याचं ठिकाणी परत येऊन pause करून ही स्लाईड व्यवस्थित वाचू शकता व काही शंका असतील तर खाली comment box मध्ये मला प्रश्न विचारू शकता.

प्रत्येक प्रेग्नंट पेशंटची Thyroid ची तपासणी करायलाच हवी का ? खरतरं उत्तर आहे होय. कारण 60 % लोकांचं diagnosis हे blood reports मधूनच लक्षात येतं. त्यातही ह्या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे जे हाय रिस्क कटेगिरी मध्ये मोडतात, त्यांनी तर जरूर तपासणी करायला हवी.

Actually प्रेग्नन्सी मध्येT3 आणि T4 यांच्या ऐवजी फ्री T3 आणि फ्री T4 यांची तपासणी जास्त महत्वाची ठरते. Thyroid चे संपूर्ण profile करणे शक्य नसेल तर निदान TSH ची तरी तपासणी जरूर करायला हवी आणि ती देखील लवकरात लवकर.

काही स्त्रियांना प्रेग्नन्सीच्या आधीपासूनच thyroid होर्मोन्सच्या गोळ्या चालू असतात तर काहींना प्रेगन्सीच्या वेळी रुटीन म्हणून केलेल्या चेकअप मधून आपल्या Thyroid levels abnormal आहेत हे लक्षात येते. Hypothyroidism असेल तर Levothyroxine चा वापर केला जातो आणि नऊ  महिन्यापर्यंत त्याच गोळ्या चालतात फक्त हार्मोन्सच्या levels आणि पेशंटचं वजन पाहून गोळीचा डोस ठरवावा लागतो. प्रेग्नन्सीमध्ये थोडा higher side लाच डोस ठेवावा लागतो.  आपण मागाशी बघितलं त्यानुसार Hyperthyroidism with pregnancy हे combination फारसं बघायला मिळत नाही, मात्र जर अस आढळल तर अधिक काळजी घ्यावी लागते कारण पहिल्या तीन महिन्यात फक्त PTU चा उपयोग करायचा असतो आणि तीन महिन्यांनंतर methimazolया औषधाचा उपयोग केला जातो.

आता जाता जाता काही हेल्थ टिप्स –
1. आपल्याला प्रेग्नंसी पूर्वी thyroid ची औषधं चालू असतील तर आपल्या डॉक्टरांना आपणहून त्याची कल्पना द्या.
2. प्रेग्नंसी च्या पहिल्या तीन महिन्यात आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने thyroid हॉर्मोन्सच्या levels न विसरता तपासून घ्या.
3. आपल्याला प्रेग्नंसी मध्ये कोणत्या प्रकारचा thyroid आजार झाला आहे म्हणजे Hypothyroidism आहे की Hyperthyroidism आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे आहारात बदल करा.
4. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये Hyperthyroidism आणि त्याच्या मागच्या व्हिडिओ मध्ये Hypothyroidism विषयी बोललो होतो,त्या त्या व्हीडिओंमध्ये व्यायाम आणि आहार यांच्याबद्दल माहिती दिली आहे, ती जरूर फॉलो करा.
5. Hyperthyroidism असेल तर आयडीन युक्त पदार्थांचा लिमिटेड वापर करा.
6. आयोडाइज्ड मिठाचा अत्यल्प वापर करा, त्याऐवजी रॉक salt म्हणजे सैंधव मिठाचा वापर करा, मात्र hypothyroid असेल तर आयोडाइज्ड मिठाचाच  वापर करा. प्रेग्नंसी मध्ये आयोडीन ची मात्रा एरव्ही पेक्षा जास्त लागते, हे लक्षात ठेऊन ही मात्रा औषधांपेक्षा आहारातून मिळवण्याचा प्रयत्न करा.

प्रेग्नंसी हे नऊ महिन्याचे आजारपण नसून ती आयुष्यात एकदा किंवा दोनदाच अनुभवाला येणारी अवस्था आहे. योग्य आहार, व्यायाम व पुरेशी झोप घेतल्यास शरीररिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहून बाळावर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होतो. ही अवस्था खूप छानरीतीने एंजॉय करण्यासाठी माझ्या अनेक सख्यांना all the best…

प्रेग्नंसी अवस्थेत असलेल्या तुमच्या काही शंका असतील तर माझा प्रेग्नंसी हेल्पलाइन नावाचा whats app ग्रुप आहे, ज्याची लिंक खाली discription बॉक्स मध्ये पोस्ट केली आहे, त्या ग्रुप ल तुम्ही जॉइन होऊ शकता आणि तुमचे प्रश्न मला विचारू शकता, मी नक्की त्यांची उत्तरं देईन.

पुढच्या आठवड्यात नवीन महितीसह नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद

– डॉ. गौरी गणपत्ये
M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet
स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ
मोबाईल: 9423511070
ई-मेल: [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.