Sobat Sakhichi : सोबत सखीची – मासिक पाळी म्हणजे काय ?

What is menstrual cycle

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. स्त्रियांच्या व्याधी, या विषयावरील या मालिकेतील हा तिसरा भाग…


सोबत सखीची – भाग 3

मासिक पाळी म्हणजे काय ?

नमस्कार
आपण मासिक पाळी बद्दल साध्या सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिली शंका …मासिक पाळी का म्हणतात ? साधं उत्तर आहे …दर महिन्याला येते म्हणून..आणि महिन्याभरात प्रत्येकीची कधी न कधी वेळ / पाळी येते म्हणून .. गम्मत सोडून देऊ…शास्त्रीय करणाकडे वळू.

स्त्रियांमध्ये reproductive एज ग्रुप मध्ये म्हणजेच वयाच्या साधारण बारा तेराव्या वर्षीपासून वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपर्यंत दर महिन्याला चार ते पाच दिवस योनिमार्गाच्या जागेद्वारे रक्त स्त्राव होतो त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. यालाच शास्त्रीय भाषेत menstruation किंवा एमसी असं म्हणतात. M for menstruation आणि c for cycle.

स्त्रीची मासिक पाळी हे तिच्या मातृत्वाच्या तयारीच्या दृष्टीने निसर्गाने टाकलेल एक पाऊल आहे. प्रेग्नसीच्या काळात आणि डिलिव्हरीनंतर काही काळासाठी मासिक पाळी बंद असते. अर्थात प्रत्येक वेळी मासिक पाळी बंद झाली म्हणजे प्रेग्नन्सी असतेच असं नाही. त्याची इतरही काही कारणं आहेत, ती कारणं आपण नंतर कधीतरी बघू. पण reproductive age ग्रुप मध्ये नियमित पाळी येण हे प्रेग्नसी नसल्याचं द्योतक आहे. हे मासिक पाळीचं हे चक्र समजून घ्यायचं असेल तर डोळ्यासमोर रिले रेस आणा. त्यामध्ये काय असत ? एकच सलग ट्रेक असतो आणि 3/ 4 participantस असतात.

एक participant हातात स्टिक घेऊन धावायला सुरुवात करतो. थोडं अंतर धावून दुसऱ्या participant पर्यंत पोचतो. मग तो दुसरा participant ती स्टिक घेऊन तिसऱ्या participant पर्यंत जातो. स्पर्धा पूर्ण होते तेव्हा काय picture दिसतं ? स्पर्धा सुरु केलेला participant आणि शेवट केलेला participant दोन्हीही वेगवेगळे असतात आणि स्पर्धेचं सुरु होण्याचं ठिकाण आणि स्पर्धा संपण्याच ठिकाण वेगवेगळ असत.
मासिक पाळी मध्ये अगदी तसचं होतं.

मासिक पाळीची रिले रेस मेंदूपासून सुरु होते आणि योनीमार्गाच शेवटच टोक म्हणजे त्वचेवरच्या ओपेनिंग वर येऊन संपते. हा धावण्याचा जो ट्रक आहे, त्याला शास्त्रीय भाषेत HPO axis म्हणतात. त्याचा long फॉर्म पहिला तर Hypothalamo pitutory Ovarian axis म्हणतात.
यातले H म्हणजे hypothalamus आणि P म्हणजे pitutory हे दोन्ही participants मेंदू मध्ये असतात आणि शेवटचा O म्हणजे ovary हा स्पर्धक ओटीपोटात असतो.

रिलेचे participant एका कडून दुसऱ्याकडे स्टिक पोचवण्याच काम करतात तसं हे HPO axis चे participant मासिक पाळीच्या संदेशाची स्टिक पोचवण्याचे काम करतात. इथे ट्रक एकच असतो, संदेश ही एकच म्हणजे मासिक पाळीचाच असतो. पण फक्त प्रत्येकाच्या स्वत: च्या भाषेत असतो. म्हणजे असं … hypothalamus पासून निघालेला संदेश pitutory gland पर्यंत पोचतो. pitutory तो संदेश ग्रहण करून आपला स्वतचा संदेश ओवारी पर्यंत पोचवतो. ओव्हरी तो संदेश ग्रहण करते आणि गर्भाशयाच्या आतल्या स्तरावर कार्य करते. ही रिले रेस दिसताना जरी सोपी दिसली तरी प्रत्यक्षात खूप गुंतागुंतीची असते आणि महिनाभर चालणारी असते. या रेसचा परिणाम स्त्रीबीज आणि गर्भाशयाच्या आतला स्तर या दोन्हींवर होतो.

निसर्गाची आंतरिक शक्ति मानवजातीचा वंश वाढवण्यासाठी दर महिन्याला मासिक पाळीच्या चक्रमधून शरीराला संधी देत असते. या नुसार महिन्यातून एकदा मासिक चक्राच्या मध्यावर म्हणजेच १५ व्या दिवसाच्या आसपास ओव्हरीतून एक स्त्रीबीज तयार होत असतं. पण त्याचा जिवंत राहण्याचा कालावधी फक्त चोवीस तास इतकाच असतो.

त्या कालावधीत जर पुरुषाचे शुक्रजंतू उपस्थित असले तर प्रेग्नसी रहाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. ढोबळमानाने पहिल्या पंधरा दिवसात स्त्रीबीज वाढणे आणि गर्भाशयातला स्तर वाढणे ही दोन्ही कामे एकाच वेळी चालू असतात. त्याच्या पुढचे पंधरा दिवस मात्र स्त्रीबिजाच पुढं काय होतं यावर अवलंबून असतात. म्हणजे असं की स्त्रीबीजामुळे गर्भधारणा झालीच तर हे काम पुढे चालू रहाते आणि हा स्तर बाळाच्या वाढीसाठी मदत करतो. गर्भ धारणा झाली नाही तर ते स्त्रीबीज मरून जातं आणि गर्भाशयाच्या आतल्या स्तराला त्याची चाहूल लागते. उरलेल्या पंधरा दिवसांच्या अखेरीस ते मेलेलं स्त्रीबीज आणि गर्भाशयाच्या आतला स्तर यांच्यात काही बदल होतात. ते बदल पूर्ण झाले की मासिक पाळीच्या रूपाने ते मेलेलं स्त्री बीज आणि गर्भाशयाच्या आतला स्तर मासिक पाळीच्या रूपाने शरीराच्या बाहेर पडतो.

आता तुमच्या लक्षात आलं असेल की मासिक पाळीचा स्त्राव म्हणजे नेमकं काय असतं? तर त्यात मेलेल्या स्त्रीबिजाचे तुकडे आणि गर्भाशयाच्या आतला स्तर असतो. एकदा मासिक पाळी येऊन गेली की हा स्तर पूर्णपणे wash out होऊन जातो, आणि पुन्हा नव्याने पुढची रिले रेस सुरु होते. पुन्हा hypothalamus, पुन्हा pituitary आणि ovary नव्याने कामाला लागतात. या नव्या सायकल मध्ये शरीरातली नैसर्गिक शक्ती नव्याने सगळी प्रक्रिया घडवून आणण्याच्या कामी लागते.

एक लॉजिक किंवा सत्य – निसर्गाला सजीव असलेल्या प्रत्येक प्राणिमात्राचा वंश वाढवायचा असतो. त्यामुळे प्रत्येक महिन्यात गर्भ धारणेची संधी असते किंवा धोका असतो.

त्यात परत शरीराच्या आतल्या अवयवांना हे माहित नसतं की गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले शुक्रजंतू कायदेशीररीत्या लग्नानंतर वैवाहिक जीवनाचा भाग म्हणून आले आहेत की लग्न न होता बेकायदेशीररित्या स्त्रीच्या इच्छेने किंवा अनिच्छेने आले आहेत, निसर्ग शरीरातल्या शक्तीला गर्भ धारणा होण्यासाठी जास्तीत जास्त प्रेरणा देत रहाणार, त्याच्याकडे संधी म्हणून बघायचं की धोका म्हणून बघायचं ते आपल्या हातात आहे कारण कायद्याच्या भाषेत आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा लग्नानंतर झालेली गर्भधारणा आणि त्यातून जन्माला आलेल्या बाळाचं सगळे कौतुकच करतात.
पण लग्न न होता प्रेग्नसी राहिली तर त्याचा सामाजिकदृष्ट्या चारित्र्यावर डाग पडतो आणि कायद्याच्या दृष्टीने सुद्धा बाळाच्या माथ्यावर अनौरस संतती चा शिक्का बसतो…त्यामुळे सावध रहा ….सुखी रहा ..!!

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.