Maruti Bhapkar Arrested : आंदोलनाच्या तयारीत असलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज (मंगळवारी) पार पडणार आहे. या दरम्यान आंदोलनाच्या तयारीत असलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर (Maruti Bhapkar Arrested) यांनी सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाकपर यांनी पोलीस ठाण्यातच लाक्षणिक उपोषण सुरु केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (14 जून) देहूत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान यांच्या कार्यक्रमादरम्यान आंदोलनाच्या तयारीत असलेल्या भापकर (Maruti Bhapkar Arrested) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Pune Accident News :  पुण्यात भरधाव डंपरची चार चाकीला धडक, आजोबा आणि दीड वर्षे नातवाचा मृत्यू

पोलीस कालपासून भापकर यांच्या मागावर होते. आज सकाळी सात वाजताच पोलिसांनी भापकर यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून नजर कैदेत ठेवले आहे. भापकर यांनी पोलीस ठाण्यातच लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.