Hinjawadi : सेलिब्रेटिंना फॉलो करा अन 30 टक्के नफा मिळवा म्हणत महिलेची पावणे नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – इन्स्टाग्रामवर सेलिब्रेटींनी फॉलो करा व 30 टक्के नफा मिळवा  (Hinjawadi)असे आमिष दाखवून दोघांनी महिलेकडून तब्बल पावणे नऊ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार 6 मे ते 9 मे या कालावधीत हिंजवडी येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून टेलिग्राम युजर्स आनाया शर्मा व आरना खत्री यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी टेलीग्रामद्वारे संपर्क साधला. त्यानी फिर्यादीला सेलेब्रिटींना फोलो करायला सांगितलेव वेळोवेळी पैस गुंतवण्यास सांगितले.

यातून 30 टक्के जास्त फायदा मिळेल असे आमिष दाखवले. मात्र (Hinjawadi) फिर्यादी कडून 8 लाख 75 हजार रुपये घेत याचा कोणताही नफा परत केलेला नाही. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.