Dehugaon Crime News : लॉटरी सेंटरमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; 13 जण अटकेत

एमपीसी न्यूज – देहूगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (दि. 13) दुपारी पोलिसांच्या ‘सामाजिक सुरक्षा पथकाने’ छापा मारला. या कारवाईमध्ये 13 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 99 हजार 365 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

दिवाकर अनुप सिंग (वय 23, रा. यमुनानगर, निगडी), आकाश सदाशिव राऊत (वय 19, रा. भाटे वस्ती, तळवडे), आदिनाथ सदाशिव गायकवाड (वय 40, रा. हगवणे आळी, देहूगाव) संदीप नथू वाडेकर (वय 51, रा. वराळे, तळेगाव) मिलिंद प्रकाश दांडगे (वय 45, रा. शिवाजी चौक, देहूगाव), अक्‍तर युसूफ आत्तार (वय 63, रा. बाजार आळी, देहूगाव) दिलीप जगन्नाथ काळोखे (वय 52, रा. वडाचा माळ, देहुगाव) विजय बापू गुंडरे (वय 51, रा. तालीम समोर, देहूगाव) दिलीप बापू गवारे (वय 62, रा. ग्रामपंचायत मागे, देहूगाव) भीमचंद्र नारायण जढार (वय 66, रा. स्वराज नगर, तळेगाव), रमेश गोविंद भंडारी (वय 59, रा. डोळसनाथ मंदिराशेजारी, तळेगाव), भागवत नारायणराव यादव (वय 48, रा. जैन मंदिराजवळ, देहुगाव), प्रशांत वासुदेव बॉक्‍से (वय 43, रा. निसर्ग सोसायटी, देहूगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस हवालदार सुनिल शिरसाट यांनी सोमवारी (दि. 13) देहूरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव येथील बालाजी लॉटरी सेंटरमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास छापा घालून जुगार खेळविणाऱ्या आणि खेळणाऱ्या 13 जणांना अटक केली. दरम्यानस पोलिसांनी 99 हजार 365 रुपयांचा ऐवज हस्तगत केली असून या प्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.