Pimpri News : पिंपरीतील स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

तीन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील जिंजर हॉटेल मधील Oregano Spa & Saloon येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (दि. 1) दुपारी चार वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. यात नागालँड येथील दोन तर महाराष्ट्रातील एका महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

देवेंद्रकुमार झा (वय 35), स्नेहकुमारी श्रीब्रजनंदन झा (वय 30, दोघे रा. खराळवाडी, पिंपरी. मूळ रा. झारखंड) यांच्या विरोधात याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, भारतीय दंड विधान कलम 370 (3), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी येथील जिंजर हॉटेल मधील Oregano Spa & Saloon मध्ये आरोपींनी तीन महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळणा-या पैशांवर आरोपींनी त्यांचा उदरनिर्वाह भागवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत नागालँड येथील दोन तर महाराष्ट्रातील एका महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका केली. आरोपींकडून नऊ हजार 825 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ अशोक डोंगरे, उपनिरीक्षक सिसोदिया, सोळंके, पोलीस अंमलदार नितीन लोंढे, मारुती करचुंडे, बापू कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाठ, गणेश करोटे, जालिंदर गारे, संगीता जाधव, वैष्णवी गावडे, योगेश तिडके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.