Maval News : इंदोरी येथे शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील इंदोरी येथे कुंडमळा रोडलगत एका शेतात बंदिस्त घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई सोमवारी (दि. 6) रात्री आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

राजू सीताराम दरवडे (वय 38, रा. कान्हेवाडी, ता. खेड), राहुल गुलाब येवले (वय 34, रा. कान्हेवाडी, ता. खेड), सोमनाथ चिंतामण गायकवाड (वय 33, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), सोमनाथ रामचंद्र तेलंग (वय 34, रा. कान्हेवाडी, ता. खेड), शेखर राजेंद्र गायकवाड (वय 35, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), सचिन सुरेश गरड (वय 31, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), उमेश चव्हाण (पूर्ण नाव माहिती नाही. रा. इंदोरी, ता. मावळ) यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक भगवंत मुठे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील इंदोरी येथे कुंडमळा रोडलगत एका शेतात बंदिस्त घरात रमी नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत 90 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी उमेश चव्हाण याने त्याचे शेतातील घर जुगार खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.