Chakan News : येलवाडी मधील हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील येलवाडी येथील हॉटेल तुळजा भवानी मटण खानावळ या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे मद्यविक्री सुरु होती. तसेच हॉटेल जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर देखील पोलिसांनी कारवाई केली. हा मटका अड्डा हॉटेल मालक चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 27) दुपारी करण्यात आली.

मटका चालक मालक, हॉटेल चालक मालक दिनेश मच्छिंद्र बहिरट (वय 35, रा. कान्हेवाडी, पो इंदोरी, ता. खेड), मटका रायटर सुनील किसन लोखंडे (वय 49, रा. झेंडे मळा, देहूगाव), मटका रायटर शंकर अंजनया शेट्टी (वय 60, रा. देहूरोड), मटका कॅशियर भरत त्रिंबक खांडेबराड (वय 38, रा. चाकण कडाचीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश याचे येलवाडी येथे हॉटेल तुळजा भवानी मटण खानावळ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये त्याने बेकायदेशीरपणे दारू व बिअरची विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली.

तसेच हॉटेलच्या बाजूला एका शेडमध्ये आरोपी कल्याण मटका नावाचा जुगार अड्डा चालवत होते. त्यावर देखील पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 42 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.