Dighi News: आळंदी फाट्यावरील लॉजवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा, वेश्याव्यवसाय प्रकरणी पाच महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये वेश्याव्यवसाय प्रकरणी पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 10) दुपारी करण्यात आली.

लॉज चालक सतीश कुमार शेट्टी (वय 41 रा. ठाणे), लॉज मॅनेजर सतीश गौडा (वय 35, रा. साई पॅलेस लॉज, आळंदी फाटा, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला  मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली आहे. आरोपींनी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.