Social Work Pune : पुण्यातील बालकलाकार श्रीश व दर्श खेडेकर यांचा अनोखा पुढाकार

बालकलाकारांनी 74 सफाई कर्मचा-यांच्या आरोग्यविम्याकरीता दिले अभिनयाचे मानधन

एमपीसी न्यूज – अभिनयाद्वारे मिळालेले मानधन सामाजिक कार्याला (Social Work Pune) अर्पण करीत पुण्यातील बालकलाकार श्रीश (13 वर्ष) व दर्श (10 वर्ष) खेडेकर यांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय व आजूबाजूच्या परिसरातील 74 सफाई कर्मचा-यांना दोन वर्षांसाठी एक लाखाचा आरोग्य विमा दिला आहे. लघुपट, नाट्यक्षेत्र आणि छोटया पडद्यावरील हे कलाकार विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये देखील गरजूंना सातत्याने मदत करतात, यावेळी सुद्धा त्यांनी अनोखा पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले. 

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय येथे आरोग्य विमा प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. पद्मश्री प्रसाद सावकार यांनी बालकलाकारांचा गौरव केला. यावेळी दोन्ही बालकलाकारांची आई मनीषा खेडेकर, वडिल डॉ. राजेंद्र खेडेकर, क्षेत्रीय कार्यालय मुकादम अंकुश साठे, खेडेकर, क्षेत्रीय कार्यालय मुकादम अंकुश साठे, ओरिएंटल इन्शुरन्सच्या वरिष्ठ मंडल प्रबंधक सुनिता भुरेवार, सामाजिक कार्यकर्ते विकास माने, जयवंत मिसाळ, अजय घोडे, गणेश आवळे, मंदार शेंडे, सचिन सोनवणे, समीर खांबे, संतोष वरक, आनंद लोंढे आदी उपस्थित होते.

आईचा वाढदिवस आणि नुकताच झालेला मातृदिन यानिमित्ताने हा उपक्रम या बालकलाकारांनी (Social Work Pune) राबविला आहे. यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी, पूरग्रस्त बांधवांसाठी, कोविड काळात अन्नदान करणा-या संस्थांसाठी, कोविडमुळे झालेल्या चार बालकांचा शैक्षणिक खर्च तसेच डॉल्फिन इंग्लिश मिडीयम स्कूलसह इतर काही ठिकाणी वंचितांसाठी अन्नदानासाठी आपल्याला आलेले संपूर्ण मानधन म्हणजे आजपर्यंत अडीच लाख रुपये दान केलेले आहे. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या रुग्णवाहिकेला 18 हजार रुपयांचा बार लाईट हॉर्न स्पिकर देखील भेट दिला आहे.

याप्रसंगी श्रीश खेडेकर म्हणाला, पूर्वजांची पुण्याई व आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळे आम्हाला चांगल्या शाळेत शिक्षण व एवढ्या लहान वयात अभिनय करून मानधन मिळत आहे. हेच मानधन सामाजिक वारसा जपत वंचितांसाठी खर्च होणे आवश्यक आहे. वंचितांची सेवा हेच साधू संतांची शिकवण आहे. गेल्यावर्षी कोविडच्या काळात याच वेळी माझ्या वडिलांचा फोन वारंवार कोणाला हॉस्पिटल इंजेक्शन औषधे आॅक्सिजन पाहिजे किंवा कमी करून पाहिजे यासाठी वाजत होता. या काळात विमा किती आवश्यक गोष्ट आहे हे समजले.

दर्श खेडेकर म्हणाला, आईला मी विचारले, वाढदिवसाच्या दिवशी काय द्यावे, तेव्हा आई म्हणाली असे काही करा की जेणेकरून मला अभिमान वाटेल. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे काम करणा-या लोकांचा विमा काढायचे ठरवले. त्यामुळे त्यांच्यासाठी एक लाखाचा आरोग्यविमा दोन वर्षांसाठी (Social Work Pune) वितरित केला.

यापूर्वी बालकलाकारांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मेजर जनरल सुजीत पाटील, विभागीय आयुक्त दिलीप म्हैसकर, धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख आदी मान्यवरांनी केलेला आहे.

Mumbai : राज्यभरात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.