Rahatani : सामाजिक कार्यकर्ते गोपाळ माळेकरांतर्फे दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

एमपीसी न्यूज – अपघातात हातपाय गमावलेल्या, तसेच जन्मतःच अपंगत्व आलेल्या पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील दिव्यांगांना सामाजिक कार्यकर्ते गोपाळ माळेकर यांनी आपल्या वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून कृत्रिम अवयवांचे वाटप केले.

रहाटणीत येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. पिंपळे गुरव येथील रितेश भंडारी या तरुणाला सहा महिन्यापूर्वी रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले. त्यास जयपूर फूट देण्यात आले. जन्मत:च पायाने अपंग असलेल्या संजू जगधने यास बूट देण्यात आले. महेश अडागळे यास स्टील कॅलिपर देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या आदिती निकम यांच्या पुढाकाराने कृत्रिम अवयवांचे गरजूंना वाटप करण्यात आले.

आदिती निकम म्हणाल्या, परिसरातील अनेकांपर्यंत परिस्थितीमुळे सरकारी मदत व योजना पोचत नाहीत. तसेच केवळ सरकारी योजनांवर अवलंबून न राहता समाजातील व्यक्तींनी अशा कामात पुढे यावे. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार ग प्रभाग अध्यक्ष बाबा त्रिभुवन, स्वीकृत सदस्य संदीप नखाते, संदीप गाडे, राज तापकीर, नरेंद्र माने, सविता खुळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.