Pimpri : जेष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – जेष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांना डॉ. बाबा आढाव व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन शुक्रवारी (दि.13) सन्मानित करण्यात आले. यावेळी मानव कांबळे यांना महात्मा फुले सत्यशोधकीय पगडी, घोंगडी, पुष्पहार घालून व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापौर उषा ढोरे, जेष्ठ विचारवंत गजानन खातू, मधू जोशी, संजीव साने, उल्का महाजन, अॅड. सुरेखा दळवी, सुभाष वारे, डॉ. विश्वंभर चौधरी, राजू भिसे, श्रीमंत कोकाटे, हिरामण पगार, रामदास म्हात्रे, धमेंद्र सातव, दत्ता भोसले,नितीन पवार, लता भिसे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कामगार नेते दिलीप पवार, किशोर ढोकले, डॉ. कैलास कदम, नगरसेवक संजय वाबळे, राहुल कलाटे, नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धऱ, बाबा त्रिभुवन, माया बारणे, रेखा दर्शिले, सुलभा उबाळे, आशा सूर्यवंशी, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी उपस्थित होते.

 

_MPC_DIR_MPU_II

यावेळी मेधा पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले, आज देशात नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काही विशिष्ट धर्माला डावलले जात असून आपण सारे भारतीय आहोत असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच मानव कांबळे हे आमच्या जनचळवळीचे मार्गदर्शक असल्याचे पाटकर म्हणाल्या. बाबा आढाव म्हणाले की, भारतीय संविधानाने नागरिकांना समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षतता दिली आहे. तर मनुस्मृतीत विषमता आहे त्यामुळे संविधान पाहिजे का मनुस्मृती असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

मानव कांबळे यांच्या पत्नी पुष्पा कांबळे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केले. तर सूत्रसंचलन गिरीश वाघमारे व प्रदीप पवार यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.