सोहम सोलर सिस्टीम – सौरउर्जेच्या उपकरणांसाठी एकमेव विश्वसनीय नाव

एमपीसी न्यूज- सोहम सोलर सिस्टीम हे सौरउर्जेवर चालणारी उपकरणे देणारे एक विश्वसनीय नाव असून मुख्यत्वे रॅकोल्ड या भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रॅंडची उत्पादने ग्राहकांना पुरवण्यात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. मागील सुमारे दहा वर्षांपासून सौरउर्जेच्या क्षेत्रातील सर्व उत्पादने पुरवण्यात अग्रेसर म्हणून सोहम सोलर सिस्टीम ही कंपनी ओळखली जाते. पुणे आणि परिसरात रॅकोल्ड या भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रॅंडची उपकरणे पुरवण्याचे काम अधिकृत डीलर म्हणून सोहम सोलर सिस्टीम करते. रॅकोल्ड थर्मो लिमिटेड ही अॅरिस्टॉन थर्मो ग्रुपची उपकंपनी असून सोलर वॉटर हिटर आणि हीट पंपची मोठी शृंखला या कंपनीकडे उपलब्ध आहे. रॅकोल्ड थर्मो लिमिटेडची संपूर्ण देशात मिळून सुमारे ३००० आउटलेट आहेत. सौरउर्जा निर्मितीच्या क्षेत्रात रॅकोल्ड थर्मो लिमिटेडचे मोठे नाव असून ही भारतातील या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.

सोहम सोलर सिस्टीम ही रॅकोल्ड थर्मो लिमिटेडची अधिकृत डीलर कंपनी असून घरगुती ग्राहकांना सुमारे तीन हजार उपकरणांचे वितरण करण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच घरगुती वापराशिवाय विविध हॉस्पिटल्स, हॉस्टेल्स, शाळा, औद्योगिक कॅन्टीन, सेवाभावी संस्था, आणि व्यावसायिक इमारतींनादेखील सौरउर्जेवर चालणारी उपकरणे उपलब्ध करुन दिली आहेत. योग्य मूल्य, उत्कृष्ट दर्जा, विक्रीपश्चात सेवा, संतुष्ट ग्राहक ही आमची मुख्ये उद्दीष्टे आहेत. ग्राहक देवो भव हे आम्ही आमच्या कृतीतून दर्शवून देतो. उत्तम सेवा दिल्याने आमचे ग्राहक आमचेच राहतात. एवढेच नव्हे तर ते आमचे नाव त्यांच्या इतर ओळखीच्या लोकांना देखील अभिमानाने सांगतात. आमच्या उत्तम कामामुळे आम्ही आजवर अनेक संतुष्ट ग्राहक जोडू शकलो आहोत.

_MPC_DIR_MPU_II

घरगुती सोलर वॉटर हीटर, व्यावसायिक सोलर वॉटर, हीट पंप आमच्याकडे विपुल पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे घरगुती किंवा व्यावसायिक उपयोगासाठी सोलर वॉटर हिटरच्या शोधात असाल तर आमच्याकडील विविध पर्यायांचा अवश्य विचार करा आणि सौरउर्जेचा वापर करुन पर्यावरण वाचवण्यास हातभार लावा.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा –
सोहम सोलर सिस्टीम,
शॉप नं. २, राधाकृष्ण अपार्टमेंट, हिरकणी हाउसिंग सोसा, जुनी सांगवी, पुणे – 411027
फोन नं. – 9545708649, 9011060649, 9130373463

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.