Solapur Crime News : गोव्यातून आणलेल्या दारुसाठ्यासह 18.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – गोव्यातून विक्रीसाठी आणलेल्या दारुसाठ्यासह 18 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव – तांबोळे याठिकाणी ही कारवाई केली. मुंबई विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली.

या गुन्ह्यातील आरोपी फरार झाला आहे‌. राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, आरोपीने 301 पेट्यांमध्ये गोवा राज्यातील अवैध विदेशी दारू विक्री करण्यासाठी साठा करून ठेवली होती. फरार आरोपी विरोधात महाराष्ट्र प्रोव्ही. ॲक्ट  1949 कलम 65 (ई), 81, 83 व 90 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मद्यसाठासह एकूण 18 लाख 80 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, विभागीय आयुक्त सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भरारी पथकाने ही कामगिरी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.