Solapur News : शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

एमपीसीन्यूज : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख  (वय-95 )यांचे आज, शुक्रवारी रात्री सोलापूर येथील खासगी रुग्णालयात  उपचार सुरु असताना निधन झाले.

गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया देखील पार पडली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सकाळपासून चढ -उतार सुरु होते. अखेर आज रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

गणपतराव देशमुख हे सलग 55 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.