-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon : फ्लॅट विकून दिवाळीला दुचाकी घ्यायला पैसे दे म्हणत, आईला लाकडाने मारहाण

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील फ्लॅट विकून दिवाळीनिमित्त दुचाकी विकत घ्यायला पैसे दे, असे म्हणत मुलाने आईला जळणातील लाकडाने बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 10) दुपारी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे घडला.

इंदुबाई दीपक चव्हाण (वय 60, रा. चाफेकर चौक, चिंचवड. मूळ रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे जखमी आईचे नाव आहे. याबाबत त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रदीप दीपक चव्हाण (वय 35, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदुबाई यांचा चाफेकर चौक, चिंचवड येथे फ्लॅट आहे. ‘तो फ्लॅट विकून मला दिवाळीनिमित्त दुचाकी घ्यायला पैसे दे’ अशी मागणी आरोपी मुलाने जखमी आईकडे केली. त्यावर ‘फ्लॅटच्या विक्रीबाबत बोलणी सुरु आहेत’ असे आईने आरोपी मुलाला सांगितले.

आई मुलाला समजावून सांगत असताना आरोपी मुलाने जळणातील लाकडाच्या ढीगा-यातून दांडके काढून त्याने आईला बेदम मारहाण केली. यामध्ये वृद्ध आईच्या हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.