Pimpri : महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट; आता फर्निचरसाठी सल्लागार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र, महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असताना रस्ते, उड्डाणपूल बांधण्यापासून आता फर्निचर बसविण्यापर्यंत सर्वच छोट्या-मोठ्या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे पेव फुटले आहे. महापालिकेत सल्लागारांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून या सल्लागारांवर प्रकल्प रकमेच्या सव्वा ते तीन टक्के रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी नऊ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएमएच) फर्निचर कामासाठी, वाकड येथील उद्यान विकास, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्रांती चौक ते शनिमंदिरपर्यंत रस्ता विकसित करणे, नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये पॉलिग्रास टाकणे, दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेचे नुतनीकरण, सांगवीतील रस्त्याचे नुतनीकरण तसेच ब प्रभागातील विविध विकास कामांसाठी सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तसेच वाकड येथे उद्यान विकसित करण्यासाठी वास्तू विशारद नेमण्याचा आयत्यावेळचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

दरम्यान, याबाबत विचारणा केली असता यापूर्वी देखील सल्लागार नेमले जात होते. त्यानुसारच सल्लागारांची नेमणूक केली जात असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.