Pune : मराठा आरक्षण आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे प्रश्न सोडवा; अन्यथा वर्षासमोर आंदोलन

Solve the problems of the families who committed suicide in the Maratha reservation movement; Otherwise the movement in front of the varsha : मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

एमपीसीन्यूज : मराठा आरक्षण आंदोलनातील 42 आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मार्गी लावावे; अन्यथा वर्षा बंगल्यासमोर समोर आंदोलन करु, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने येथे पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते नानासाहेब जावळे पाटील, महेश डोंगरे, संजय सावंत, महेश राणे, लक्ष्मण शिरसाठ, विजयकुमार घाडगे, दत्ता मोरे, सुनील नागणे, पंजाब घाडगे आदी उपस्थित होते.

मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 2018 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढण्यात आले. त्यामध्ये 42 मराठा समाज बांधवांचे प्राण गेले.

त्यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी राज्य सरकारने द्यावी. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला

हे ठाकरे सरकार समाजाची फसवणूक करत आहे. ते काही करत नाही, केवळ खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करत आहे, असा आरोपही करण्यात आला.

येत्या नऊ ऑगस्टला ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या घरासमोर सर्व मराठा बांधव ठिय्या आंदोलन करणार आहेत.  तोपर्यंत कोणतीही चर्चा न करता मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने करावे.

मराठा समाजातील 15 हजार आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे; अन्यथा महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.