Somatane: लाॅकडाऊनच्या काळात अवैध दारुधंद्यांचा सुकाळ 

एमपीसी न्यूज – संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरस ( कोविड-19) आजाराने थैमान घातले असल्याने संपूर्ण जग यापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या देशात तीन मेपर्यंत लाॅकडाऊन घोषित केला असून यामध्ये सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने बंद असताना मावळ तालुक्यातील पुसाणे या गावामध्ये अवैध दारुधंद्यांचा सुकाळ आला आहे. गावामध्ये जवळपास दोन ते तीन दारुधंदे सुरु आहेत.

गावातील सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी लाॅकडाऊनच्या काळात तसेच पूर्वी सुध्दा शिरगाव-परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये वेळोवेळी तक्रार केली परंतु पोलीस कारवाई झाल्यावर एक दोन दिवस दारुधंदे बंद केले जातात व पुन्हा सुरू केले जातात.

 लाॅकडाऊनच्या काळातमध्ये सर्वच हाॅटेल, बिअरबार व वाईन्स शाॅप बंद असल्याने या अवैद्य दारुधंदयांवर मोठया प्रमाणावर गर्दी होत असून परिसरातील व  गावातील व्यक्तींबरोबरच मुळशी तालुक्यातील हिंजवडी, मारूंजी, नेरे, कासारसाई, कुसगाव, दिवड, ओवळे,चांदखेड येथील मद्यपि दारु पिण्यासाठी या धंद्यावर गर्दी करत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग नियमाला हरताळ फासला जात असून त्यामुळे मावळात कोरोनाचा प्रसार होण्यास हे दारुधंदे कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे हे दारुधंदे कायमचे बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.