Somatane : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कुस्ती स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित मल्ल घडावेत असा आशावाद माजी मंत्री मदन बाफना यांनी व्यक्त केला. भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या सहकार्याने सोमाटणे येथील स्व. पै.मारूती माने, गणपत आंदळकर हिंद केसरी क्रीडानगरीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बाफना बोलत होते.

यावेळी माजी मंत्री मदन बाफना, पक्षाचे निरीक्षक विजय कोलते, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ऑलिंपिकवीर मारूती आडकर यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले.

यावेळी शंकरराव शेलार, अशोक घारे, गणेश काकडे, मोहन येवले, तुषार भेगडे, संतोष मु-हे, काळूराम सपकाळ, खंडू वाळुंज, बंडू येवले, मोहन खोपडे, पांडुरंग खाणेकर, भरत लिमण, ज्ञानेश्वर काकडे आदि उपस्थित होते. पहिल्या वरिष्ठ राष्ट्रीय ट्रेडीशनल मातीवरील कुस्ती स्पर्धेत देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लढती केलेले तीस राज्यातून सुमारे दोनशे मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सहा गटातील या स्पर्धा आहेत.

आज मावळ मल्ल सम्राट व जिल्हा मल्ल सम्राट चषक स्पर्धा संपन्न झाल्या, या स्पर्धेत सुमारे दीडशे मल्ल सहभागी झाले होते. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

बाबा लिमण व विकास वाजे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत मोहोळ, रोहिदास आमले, पप्पू कालेकर, संजय दाभाडे, तुषार डिंबळे, राकेश सोरटे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.