Somatane phata : विद्युत वाहिनीच्या मनोऱ्यावरून मनोरुग्ण पडला

एमपीसी न्यूज : एक मनोरुग्ण महावितरण कंपनीच्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या मनोऱ्यावर चढून 50 फूट खाली पडला  असल्याची घटना आज दुपारी 2.30 वा सोमाटणे फाटा येथे घडली. उंचावरून पडूनही हा मनोरूग्ण वाचला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोल नाक्याजवळ महावितरण कंपनीचा उच्चदाब विद्युत वाहिनीचा मनोरा(टॉवर) आहे. तीस वर्षे म्हणून तरुण गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास या टॉवरवर चढला. हे तेथील स्थानिक नागरिकांनी पाहिले व त्यांनी 112 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला.(somatane phata) त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे प्रश्न पोलीस निरीक्षक गणेश जमादवाड, पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अग्निशमन विभाग व महावितरण कंपनीला या घटनेबाबत माहिती कळवली. महावितरणने  वीज बोर्ड खंडित केल्याने या टॉवर वरील विस्तारांमध्ये वीज प्रवाह नव्हता.

तो तरुण टॉवरच्या टोकावर चढून सर्वात वरच्या वीज ताईला पकडून लोंबकळत होता. कारण मध्ये वीज प्रवाह नसल्याने त्याला विजेचा धक्का लागला नाही. तो तारेला पकडून हळूहळू पुढे सरकत जाऊ लागला.(somatane Phata) हे सर्व पाहण्यासाठी तिथे व पुणे-मुंबई महामार्गावर खूप मोठी गर्दी जमली होती. काही नागरिकांनी या घटनेचे मोबाईल मध्ये फोटो काढले तर काहींनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.

Pune news: सेवा पंधरवडा निमित्ताने मंथन फाउंडेशनच्या वतीने बुधवार पेठ येथे पोषण आहार वाटप

थोड्या वेळाने तरुणाचा हात सुटल्याने तो 50 फूट खाली पडला. प्रथम तो झाडांच्या फांद्यावर पडला व नंतर झाडाखालील गवत आणि चिखलात पडला.(Somatane phata) अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्या तरुणाला तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.