CM Eknath Shinde : सोमाटणे टोल नाक्याबाबत लवकरच बैठक – मुख्यमंत्री शिंदे

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा टोलनाक्याच्या विरोधात (CM Eknath Shinde) आंदोलन करणाऱ्या किशोर आवारे यांच्याशी आपले फोनवर बोलणे झाले असून या प्रश्नावर लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

 

 

सोमाटणे फाटा टोल नाका बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत हा टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज चौथा दिवस होता. त्यातच आज सोमाटणे टोल नाका येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

 

विधानसभेत या आंदोलनाचे पडसाद उमटले.(CM Eknath Shinde) आंदोलनकर्ते आवारे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याशी आपण काल रात्री स्वतः बोललो असून या विषयासंदर्भात लवकरच बैठक बोलवण्याचे ठरले आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.