Somatne News : सोमाटणे टोलनाक्याची ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

वाहतूक कोंडी टाळण्याच्या सूचना

एमपीसीन्यूज : सोमाटणे फाटा येथील जुना पुणे -मुंबई महामार्गावरील टोल नाक्यावर वारंवार होणारी वाहतुक कोंडी तसेच स्थानिकांकडून होणारी टोल वसुली रोखण्यासाठी मागील महिन्यापासून आमदार सुनिल शेळके एमएसआरडीसीकडे पाठपुरावा करत होते. त्यानुसार करण्यात आलेल्या उपाययोजनांची एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.12) पाहणी केली. तसेच वाहतूक कोंडी टाळण्याच्या सूचना दिल्या.

सोमाटने येथील जुना पुणे-मुंबई महामार्गावरील तोल नाक्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्याकडे केली होती.

त्यानुसार शुक्रवारी (दि.12) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापक संचालक राधेश्याम मोपलवार, सहाय्यक व्यवस्थापक संचालक ए. पी.  गायकवाड, सहाय्यक व्यवस्थापक संचालक विजय वाघमारे, सहाय्यक व्यवस्थापक संचालक चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य अभियंता राजेश पाटील, अधीक्षक अभियंता एस के सुरवसे , महाव्यवस्थापक पथकर नियंत्रण कमलाकर फंड, कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे, उद्योजक सुधाकर शेळके तसेच आयआरबी कंपनीचे व्यवस्थापक यांनी सोमाटने टोल नाक्याची पाहणी केली.

तसेच टोल वसुली व्यवस्थापनास वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांचा वेटिंग टाईम कमी करणे, टोल बुथ वाढवणे, रस्त्याचे रुंदीकरण करणे, लेन वाढवणे व प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.