Somatne News : … तर मावळ तालुका विकासाचे नवे मॉडेल ठरेल : सचिन घोटकुले

सोमाटणे गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसीन्यूज : सोमाटणे गावाच्या धर्तीवर सर्वच ग्रामपंचायतीची विकासकामे झाली तर मावळ हा लवकरच महाराष्ट्रात विकसित तालुका म्हणून नावारूपाला येईल. शिवाय विकासाचे नवे मॉडेल म्हणून मावळचे ओळख निर्माण होईल. गावातील विकासाच्या कामाची गती अत्यंत चांगली आहे आणि भविष्यात ती अशीच राहिली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी केले.

सोमाटणे – विठ्ठलवाडी येथील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या 15 फुट रुंद आणि 800 फुटलांबीच्या  अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सचिन घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, सरपंच स्वाती कांबळे, उपसरपंच विशाल मुऱ्हे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णु मुऱ्हे, भाजपा संघटन मंत्री राजेश मुऱ्हे, सदस्य शैलेश मुऱ्हे, रवींद्र मुऱ्हे, संदीप मुऱ्हे, प्रवीण मुऱ्हे, सचिन गायकवाड, माजी सरपंच प्रभाकर काकडे, राजाराम मुऱ्हे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या कामासाठी ग्रामपंचायत सुमारे 25 लाखाचा निधी खर्च करणार असल्याचे उपसरपंच विशाल मुऱ्हे यांनी सांगितले.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 20 लाख रुपये खर्चून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. शिवाय एका बाजूला 18 हाय मॅक्स दिवे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे विठ्ठलवाडी आणि परिसर रात्री सुद्धा उजळून निघणार आहे.

गणपती मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची आणि भक्तांची वर्दळ नेहमीच असते. त्यामुळे हा रस्ता खुप खराब झाला होता. परंतु, आता रस्त्याचे काम दर्जेदार करण्यावर भर दिला असल्याचे उपसरपंच विशाल मुऱ्हे यांनी सांगितले.

बरेच दिवस रखडलेल्या या कामाने आता गती घेतली असून येत्या15 ते 20 दिवसात या कामाचे लोकार्पण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.