Maval News: सोमाटणे फाटा चौक वाहतूक कोंडीने त्रस्त, वाहतूक पोलिसांची कमी पडतेय का गस्त?

एमपीसी न्यूज: सोमाटणे फाटा हा मावळ तालुक्यातील हॉस्पिटल हब म्हणून ओळखला जातो ,परंतु ह्याच परिसरातील मुख्य चौकामध्येरोज होतअसलेल्या वाहतूक कोंडीने रुग्णवाहिकेसह इतर वाहन चालकही त्रस्त झाले आहेत.वाहतूक कोंडीच्या या समस्यांवर उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडत आहेका? असेच चित्र दिसत आहे.

सोमाटणे टोलनाका ते मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग,सोमाटणे फाटा ते पवनानगर कडे जाणारा रस्ता,सोमाटणे फाटा चौक ते प्रतिशिर्डी शिरगावकडे जाणारा रस्ता या सर्वच रस्त्याना जोडणारा मुख्य सोमाटणे फाटा चौक आहे,मात्रप्रचंड वाहतूक वर्दळ असलेला हा चौक मात्र अगणित समस्यांनी ग्रासलेला आहे.सोमाटणे टोलनाका हा जवळ असल्याने मुंबई कडे जाणाऱ्या गाड्यांची प्रचंड वाहतूक कोंडी रोज होताना दिसते.

New Sangvi news: नवी सांगवीतील रोजगार मेळाव्यात अकराशेपेक्षा जास्त जणांना ऑन द स्पॉट नोकरी; शंकर जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

तसेच कासारसाई येथे असलेल्या संत तुकाराम साखर कारखान्याकडे जाणारे उसाच्या ट्रॅक्टरमुळे वाहतुक संथ गतीने होण्यास कारणीभूत ठरते.सोमाटणे फाटा चौक येथे असलेल्या रस्त्यालगतच्या व्यवसायीकांमुळे देखील वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भव आहेत.अनेकदा या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला हॉस्पिटल मध्येजाण्यास विलंब होत असतो,परिणामी रुग्णांवर जीविताचे संकटही ओढावले जाऊ शकते. मुख्य चौकामध्ये पूर्णवेळ वाहतूक पोलीस अधिकारी उपलब्ध व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवरही आळा घालता येईल,बॅरिकेट्स द्वारे वाहनांना योग्यपद्धतीने मार्गस्थ देखील करता येऊ शकते व सिग्नल यंत्रणा देखील बसविण्यात याव्या अशा नागरिकांच्या सूचना आहेत.

वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहनचालकही तितकेच जबाबदार असतात,लेन सोडून वाहन चालविणाऱ्या चालकांवरही कारवाई व्हावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.