Bhosari News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर गर्भपात करण्यासाठी केले असे काही….

एमपीसी न्यूज – शौचालयासाठी जात असलेल्या 15 वर्षीय मुलीला अडवून एका तरुणाने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. हे माहिती झाल्यानंतर आरोपी तरुणाने तिचा गर्भात करण्याचा देखील प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार एक मार्च 2021 रोजी रात्री भोसरी परिसरात घडला.

बलात्कार करणा-या 22 वर्षीय आणि त्याचा 19 वर्षीय साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि. 18) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 15 वर्षीय पीडित मुलगी शौचालयासाठी जात असताना 22 वर्षीय आरोपीने तिचा पाठलाग केला. तिचे तोंड हाताने दाबून तिला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.

त्यानंतर देखील आरोपीने अशाच प्रकारे धमकी देऊन पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तिचा गर्भ खाली करण्यासाठी दोन पपई आणि कोणत्यातरी गोळ्या खाण्यास दिल्या. हा धक्कादायक प्रकार सप्टेंबर महिन्यात उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.