Sangvi : घर खाली करण्यासाठी वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घर खाली करण्यासाठी तसेच घराचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी मुलगा, सून, त्यांच्या कंपनीतील दोन कामगार यांनी मिळून वृद्ध माता-पित्याला मारहाण केली. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनी स्थापन करून आई-वडिलांच्या को-या स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने सह्या घेतल्या. याप्रकरणी मुलगा, सून आणि त्यांच्या दोन कामगार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2006 पासून एक फेब्रुवारी 2020 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.

जी. वर्गीस केजी जॉर्ज (वय 70, रा. ग्रेस व्हिला, गांगार्डे नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुलगा जॉर्ज वर्गीस, सून जेनी जॉय, कंपनीतील कामगार महिला लीना व्होरा, स्मिता सावरकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त आहेत. त्यांना राहते घर खाली करण्यासाठी तसेच घराचा ताबा घेण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून वारंवार धमकी देत मारहाण केली. फिर्यादी यांच्या घराच्या नावाचा पत्ता बनवून बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी v solve india private limited या नावाची कंपनी स्थापन केली. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या को-या स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन जबरदस्तीने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या घरातील असलेल्या त्यांचे पैसे आणि दागिने आरोपी स्वतःचे असल्याचे समजून घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.