Chakan Crime News : शेतात गाय चारण्यासाठी सोडल्यावरून बाप-लेकाला मारहाण

एमपीसी न्यूज – शेतात गाय चारण्यासाठी सोडल्यावरून दोघांनी मिळून बाप-लेकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 6) दुपारी दोन वाजता खेड तालुक्यातील काळूस येथे किसन अनंता पवळे यांच्या शेतात घडली.

दत्तात्रय खंडू अरगडे (वय 40, रा. काळूस जाचक वस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित सुरेश पवळे, किसन अनंता पवळे (दोघे रा. पवळेवाडी काळूस, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किसन पवळे याने फिर्यादी यांना ‘तू आमच्या शेतात चरण्यासाठी गाय का सोडली’ असे म्हणून भांडण काढले. फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी केली व आरोपी अमित याला बोलावून घेतले. त्यानंतर अमित आणि किसन या दोघांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी केली. आरोपी अमित आणि फिर्यादी यांच्यात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे वडील खंडू बाबू अरगडे आले असता झटापटीत कोयत्याने टोक फिर्यादी यांच्या ओठावर लागून दुखापत झाली.  याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.