-MPC-TOP-MOST-BANNER-I

Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध तमासगीर दादू सरोदे इंदुरीकर यांच्या पत्नी सोनाबाई इंदुरीकर यांचे निधन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- राष्ट्रपती पदक सन्मानित, मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध तमासगीर व गाढवाचं लग्न या नामांकित वगनाट्याचे निर्माते गजानन तथा दादू सरोदे इंदुरीकर यांच्या पत्नी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सोनाबाई दादू सरोदे इंदुरीकर (वय 87) यांचे (दि 14) खंडाळा (ता. मावळ) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. विशेष म्हणजे वगसम्राट दादू इंदुरीकर यांचा दि .13 जून रोजी 41 वा स्मृती दिन होता, तर दि 14 जून रोजी पत्नी सोनाबाई यांचे निधन झाले. 

सोनाबाई यांचे खंडाळा हे माहेरगाव आहे. तर इंदोरी हे सासरगाव आहे. इंदोरी गावात राहणारे गजानन तथा दादू सरोदे इंदुरीकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. सोनाबाई यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मुंबई जिल्हा बँकेच्या निवृत्त अधिकारी श्रीमती नलिनी दादू सरोदे इंदुरीकर व मुंबई जिल्हा बँकेचे अधिकारी राजेंद्र सरोदे इंदुरीकर यांच्या त्या मातोश्री होत्या.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn