Sonalee got sentimental on varakari’s video – प्रगाढ विठ्ठल भक्तीचा व्हिडिओ बघून सोनाली झाली भावुक

Sonali became emotional after watching the video of deep devotion to Vitthal हा व्हिडीओ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही बघितला. हे दृश्य बघून त्यांना रडू आलं.

एमपीसी न्यूज – यंदाच्या आषाढी वारीला करोनाचे ग्रहण लागले. मोजक्या भक्तांच्या साथीने एस. टी. तून विविध ठिकाणाहून पादुका पंढरपूरला गेल्या. ना रिंगण रंगले, ना फुगड्या घातल्या, ना तो विठुरायाचा, संतांचा गजर ऐकू आला. पण ख-या वारक-याला याही स्थितीत फक्त विठ्ठलच आठवतो. त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्याचा सावळा विठोबाच दृष्टीस पडतो. काही दिवसांपूर्वी असाच एका वारकरी माऊलींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

नेहमीच्या सवयीने विठ्ठलाच्या ओढीने एक वारकरी काका पंढरपूरला पोचले. वेशीवर पोहोचल्यानंतर पोलिसानं अडवलं तर त्याच्यातच विठ्ठल पाहून वारकऱ्यानं हात जोडले. हा व्हिडीओ बघून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भावुक झाली.

हा व्हिडीओ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही बघितला. हे दृश्य बघून त्यांना रडू आलं. व्हिडीओ बघून त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मला रडूच आलं हा व्हिडीओ बघून… हा निर्मळपणा, भवतालाचा स्वीकार, भक्तीतली शक्ती आणि ओतप्रोत भरलेली माया माऊली.. तुम्हाला साष्टांग प्रणिपात’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खरंतर सोनालीने व्यक्त केलेल्या या भावना प्रत्येकाच्याच मनात सध्या तरी आहेत. हे करोनाचे संकट टळू दे आणि आषाढी नाही तरी कार्तिकीला तरी सावळ्या विठुरायाला डोळे भरुन पाहू दे असेच प्रत्येकाला मनोमन वाटत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.