Sonali Kulkarni Got Married : निगडीची ‘अप्सरा’ अडकली लग्नाच्या बेडीत; झाली दुबईची सून

एमपीसी न्यूज – मराठी सिनेमातील ‘अप्सरा’ निगडीची रहिवासी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज विवाहबंधनात अडकली. दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर यांच्याशी ती विवाहबद्ध झाली आहे. विशेष म्हणजे सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस असून लग्नाची बातमी देत तिनं तिच्या फॅन्सला सुखद धक्का दिला आहे. दोन फेब्रुवारी रोजी तिचा साखरपुडा झाला होता.

सोनालीने फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली. तिने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना सोनालीने लिहिलं आहे की, ‘आम्ही जूनमध्ये ‘युके’ला लग्न करणार होतो.

_MPC_DIR_MPU_II

युकेच्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख पुढे करावी लागली. मग स्थळाच्या उपलब्धतेनुसार अनुसार जुलैमधली तारीख ठरली. लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शुटिंग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनातही !’

https://m.facebook.com/story.php?story_fbid=341256050691062&id=100044200101400

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नटरंग चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आणि त्याच चित्रपटातील लावणी, ‘अप्सरा आली…’ या लावणीमुळे चाहत्यांमध्ये सोनालीची ओळख अप्सरा म्हणून निर्माण झाली. सोनालीच्या नावावर अनेक सुपरहिट मराठी चित्रपट आहेत. एक-दोन हिंदी चित्रपटात देखील तिनं भुमिका केल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.