Pune News: प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी गुंजणार ‘गाणे स्वातंत्र्याचे’!

एमपीसी न्यूज, आवाज न्यूज आणि इमराल्ड रिसोर्ट यांच्या वतीने 'ऑनलाईन' साजरा होणार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या (26 जानेवारी) संथ्याकाळी ‘गाणे स्वातंत्र्याचे’ हा देशभक्तीपर मराठी-हिंदी गाण्यांचा सदाबहार ‘ऑनलाईन’ कार्यक्रम होणार आहे. एमपीसी न्यूज व आवाज न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तळेगाव दाभाडे येथील इमराल्ड रिसोर्टच्या विशेष सहकार्याने या संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. 
एमपीसी न्यूज व आवाज न्यूज चॅनलच्या फेसबुक पेजवर 26 जानेवारीला संध्याकाळी सहा वाजल्यापासून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (फेसबुक लाईव्ह) केले जाणार आहे. तळेगाव दाभाडे येथील नादब्रह्म संगीतालयाचे कलाकार हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.‌

आपला भारत देश सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  साजरा करीत आहे. त्यामुळे या वर्षीच्या प्रजासत्ताकदिनाला देखील विशेष महत्त्व आहे. हे औचित्य साधत ‘गाणे स्वातंत्र्याचे’ हा देशभक्ती जागृत करणारा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या ऑनलाईन सोहळ्यात सहभागी होऊन सर्व देशप्रेमी बंधू-भगिनींनी संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

तळेगाव दाभाडे येथील नादब्रह्म संगीतालयाचे प्रतिथयश कलाकार संपदा थिटे, विनायक लिमये, अंकुर शुक्ल, विराज सवाई, डॉ. सावनी परगी, प्रणव केसकर, कीर्ती घाणेकर, निधी पारेख, धनश्री शिंदे आणि चांदणी पांडे यांचा कलाविष्कार यावेळी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. मंगेश राजहंस, प्रवीण ढवळे व अमोल पांढरे  हे वादक कलाकार त्यांना साथसंगत करणार आहेत. नामवंत निवेदिका डॉ. विनया केसकर त्यांच्या खास शैलीत कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.