Sonia Gandhi Hospitalized: सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (गुरुवारी) संध्याकाळी दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोनिया गांधी या नेहमीच्या वैद्यकीय चाचण्या व तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली.

सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजताच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केल्या आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.