Sonu Sood’s Request To Indians: सोनू सूदची देशवासियांना कळकळीची विनंती

Sonu Sood's Request To Indians to help poor people कृपया गरजवंतांची मदत करा. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी पुढे या आणि कोरोना रुग्णांना मदत करा.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात हजारो स्थलांतरितांना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी अभिनेता सोनू सूदने निरपेक्ष वृत्तीने भरभरुन मदत केली. त्याने या कामगारांसाठी खास गाड्या पाठवल्या. त्यांना खाद्यपदार्थ पुरवले. त्यांच्या निवासाची सोय केली. आता कोरोनाची साथ सुरु होऊन सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे.

अजूनही विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आतापर्यंत देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोक बेरोजगार झाले आहेत. शिवाय करोनाला रोखणारी कुठलीही अधिकृत लस अद्याप तयार झालेली नाही.

अशा प्रतिकूल परिस्थितीत गरजवंतांची मदत करा, अशी विनंती अभिनेता सोनू सूदने देशवासियांना केली आहे. ‘जे सक्षम आहेत त्यांनी पुढे या अन् किमान एका गरीब रुग्णाच्या औषधांचा खर्च उचला’, अशी विनंती त्याने केली आहे.

‘कृपया गरजवंतांची मदत करा. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी पुढे या आणि कोरोना रुग्णांना मदत करा. गरीब रुग्णांना दत्तक घ्या किंवा त्यांच्या औषधांचा खर्च उचला. जर आपण अशी मदत केली तर कोरोनाचं संकट हळूहळू कमी होत जाईल’, अशा आशयाचं ट्विट सोनू सूदने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.