Sourav Ganguly B’day : सौरव गांगुली! टीम इंडियाला विजयाची सवय लावणारा एक यशस्वी कर्णधार 

Sourav Ganguly! A successful captain who has made Team India a habit of victory सौरव गांगुली उर्फ दादा याचा आज 49 वा वाढदिवस.

एमपीसी न्यूज – सौरव गांगुली उर्फ दादा याचा आज 49 वा वाढदिवस. भारतीय संघाला विजयाची सवय लावणारा तसेच भारतीय सांघाचा आंतराष्ट्रीय स्तरावर देखील डंका वाजवणाऱा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून सौरव गांगुलीची ओळख आहे.

सौरव गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या खेळी केल्या, पण त्याची नेतृत्वशैली  अधिक चर्चेचा विषय ठरला. परदेशात सततच्या अपयशामुळे भारतीय संघाची प्रतिंमा काहीशी मलीन झाली होती. पण गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही सामने जिंकण्यास सुरुवात केली. गांगुलीच्या ‘दादा’गिरीने भारताला विजयाची सवय लावली. गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

लॉर्डसच्या गॅलरीत टी-शर्ट फिरवून आनंद साजरा करतानाचा फोटो अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. इंग्लंडविरुद्ध 2002 साली नेटवेस्ट फायनल जहां जिंकल्यानंतर दादाने आपली जर्सी उतरवली आणि एकच जल्लोष केला. त्यानंतर भारतीय टीम विश्वचषक 2003 च्या फायनलला देखील पोहोचली. 1983 नंतर दुसऱ्यांदा भारतीय संघाला वर्ल्डकपच्या समीप दादानेच नेऊन ठेवलं होतं.

गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 146 एकदिवसीय सामने खेळले. त्यात 76 सामने जिंकले तर 65 सामने हरले. दादाची एकदिवसीय सामन्यातील विजयाची सरासरी 53.90 इतकी होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात टीम इंडियानं 49 पैकी 21 सामने जिंकले तर 13 सामने हरले तर 15 सामने अनिर्णित राहीले. या काळात विजयाची सरासरी तब्बल 42.85 राहिली.

गांगुलीने 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दादाने कसोटी क्रिकेटमध्ये 42.18 च्या सरासरीने 7,212 धावा केल्या आहेत. कसोटीत त्यानं 16 शतकं लगावली आहेत. विशेष म्हणजे आपल्या पदार्पणाच्या कसोटीत त्यानं शतक ठोकलं होतं. कसोटीत त्यानं 35 अर्धशतक आणि 32 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यात गांगुलीनं 22 शतकं आणि 72 अर्धशतकांसह 40.73 च्या सरासरीनं 11,363 धावा केल्या तर 100 विकेट्स देखील त्यानं घेतल्या आहेत.

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आज देखील तो भारतीय क्रिकेटसाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे. पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशननंतर आता बीसीसीआयच्या अध्यक्ष होऊन आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

क्रीडा विश्वातून गांगुलीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पासून, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, मोहम्मद कैफ, इशांत शर्मा यांच्यासह अनेकांनी दादाला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.